अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवल मधे पार्लेकरांचे यश!

अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवल मधे पार्लेकरांचे यश!

अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवल मधे पार्लेकरांचे यश!

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित 8 व्या ‘अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवल २०२३’ चा पुरस्कार सोहळा शनिवारी 20 मे रोजी संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात ‘समायरा’ या चित्रपटाला पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन पार्ल्याच्या ऋषी देशपांडे यांनी केले आहे तसेच संगीत पार्ल्याच्याच निहार शेंबेकर यांनी केले आहे. या दोन्ही कलावंतांनी उत्कृष्ट दिग्दर्शक व उत्कृष्ट संगीत या पारितोषिकांवर आपले नाव कोरले आहे. सर्व पार्लेकरांतर्फे दिग्दर्शक ऋषी देशपांडे आणि संगीतकार निहार शेंबेकर यांचे अभिनंदन!
Back to top