डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या “Economics of Survival” या ग्रंथाचे प्रकाशन !

डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या “Economics of Survival” या ग्रंथाचे प्रकाशन !

डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या “Economics of Survival” या ग्रंथाचे प्रकाशन !

१९ मे रोजी लोकमान्य सेवा संघाच्या ‘ पु.ल देशपांडे सभागृह’ येथे डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या ‘Economics of Survival’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. विविध क्षेत्रातील वाचकांची या सोहळ्याला उत्तम उपस्थिती होती. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे वित्तीय प्रमुख श्री. यात्रिक विन यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. जागतिक गोंधळाच्या आजच्या परिस्थितीत या ग्रंथाची प्रखर आवश्यकता त्यांनी विषद केली तसेच मणिपाल विद्यापीठ प्रकाशन संस्थेच्या प्रमुख डॉ. नीता इनामदार म्हणाल्या, “येत्या कालखंडात हा ग्रंथ आम्हाला खूप मार्गदर्शक ठरेल”. एस व्ही फाटक ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. विवेक भट यांनी या ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित केले. हा ग्रंथ खालील लिंक वरून मागवता येईल. https://mup.manipal.edu/product/economics-of-survival-sustainable-inclusive-equitable-prosperity/

Back to top