दीपाली कामत आगरवाल यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार

दीपाली कामत आगरवाल यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार

दीपाली कामत आगरवाल यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार

संगीताचा वारसा लाभलेल्या आणि शास्त्रीय गायनाचे शिक्षण पूर्ण करून आपला संसार व करिअर यांची सांगड घालत विविध पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या आजच्या पिढीतील गायिका म्हणजेच सौ. दीपाली कामत अगरवाल.

नुकतेच त्यांना प्रतिष्ठेच्या ‘Rangoli Awards 2023’ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट गायिका’ म्हणून सन्मानित केले गेले. हा पुरस्कार UNIMO(Universe of Mom’s) या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रदान केला गेला. दीपाली यांच्या संगीतातील योगदानाबद्दल UNIMO (World ‘s Largest community of mothers) ने विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या ३१ महिलांमध्ये त्यांची निवड केली..त्यांच्या पुरस्काराचे नाव ‘Mompreneur in the field of singing ‘ असे आहे.

दीपाली ‘Swardeep music Academy ‘ या संस्थेच्या संस्थापक आणि संचालक आहेत. त्या स्वतः हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत व हिंदी चित्रपट संगीताचे शिक्षण त्यांच्या संस्थेच्या विलेपार्ले (पूर्व) आणि अंधेरी (पूर्व) येथील शाखांमधून तसेच ऑनलाईन माध्यमातून देतात. आतापर्यंत त्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून जगभरातील तब्बल १५०० विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले आहेत. त्यांच्या या संस्थेने यावर्षी १० वर्षे पूर्ण केली.

दीपाली यांच्या संगीताच्या सुरांनी जोडलेले ‘स्वरदीप’ हे कुटुंब उत्तरोत्तर नक्कीच विस्तारत जाईल याबद्दल तिळमात्रही शंका नाही.

Back to top