१२ वा ‘पार्ले स्वर वसंत’ होणार संपन्न
सालाबादप्रमाणे या वर्षीही पार्ल्यातील संगीत रसिकांना मेजवानी घेऊन येणारा ‘पार्ले स्वर वसंत ‘या वर्षी येत्या ३१ जाने,१,२ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे.
आजच्या आघाडीच्या शास्त्रीय गायिका श्रीमती गौरी पाठारे यांच्या ईश्वरी-स्वर फाउंडेशन व रामांजनेय देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत पंचमीचे औचित्य साधून ‘पार्ले स्वर वसंत’ हा तीन दिवसांचा शास्त्रीय संगीत महोत्सव लक्ष्मीनारायण प्रसाद लॅान्स , पार्ले पूर्व येथे संपन्न होत आहे. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी अनेक दिग्गज व गुणी कलाकार आपली कला या महोत्सवात सादर करणार आहेत. दररोज सायं ५.३० ते १० ह्या वेळात संपन्न होणारा हा महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे. ‘आम्ही पार्लेकर’ या संगीत उपक्रमाचे मीडिया पार्टनर आहे.