
अनुराधा राज्याध्यक्ष यांच्या शॉर्ट फिल्मला पुरस्कार
भारतीय चित्र साधनेने प्रेरित नागपूर चलचित्र फाउंडेशन चित्रपट यांनी भारतीय संस्कृती, मूल्ये आणि समाजावर आधारित चित्रपट बनवणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर येथे लघु चित्रपट महोत्सव साजरा केला. या वर्षी ११आणि १२ जानेवारी रोजी झालेल्या या लघु चित्रपट महोत्सवात व्यावसायिक निर्मात्यांच्या गटात विलेपार्ले स्थित अनुराधा राजाध्यक्ष यांच्या ‘किचन क्वीन ‘ या लघु चित्रपटास द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील त्यांनी प्राप्त केला.विशेष म्हणजे या लघु चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन व संकलनदेखील त्यांनीच केले होते. लघु चित्रपटाचा विषय महिला सक्षमीकरण असा होता. आणि ‘किचन क्वीन ‘ या लघु चित्रपटाच्या सर्व आघाड्या लीलया पेलत अनुराधा राजाध्यक्ष यांनी लघु चित्रपट आणि अभिनय या दोन्हीसाठी मिळवलेल्या पुरस्कारांनी महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट अधोरेखित केले आहे. या चित्रपट महोत्सवात देश विदेशातील शेकडो चित्रपट निर्मात्यांनी सहभाग घेतला होता.