अरुण पुराणिक यांच्या पुस्तक प्रकाशनाचा चौकार

अरुण पुराणिक यांच्या पुस्तक प्रकाशनाचा चौकार

अरुण पुराणिक यांच्या पुस्तक प्रकाशनाचा चौकार

‘ग्रंथाली’ आपल्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने २३ ते २५ डिसेंबर रोजी माननीय बाळासाहेब ठाकरे संकुल, सर्विस रोड, तीन हात नाका, ठाणे येथे भव्य सोहळा आयोजित करत आहे. त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बुधवार दि. २५ डिसेंबर रोजी सिने अभ्यासक व जेष्ठ पत्रकार अरुण पुराणिक यांच्या ‘सिनेमातील दृश्यकला’ (Visual Art In Cinema), ‘बी आर चोप्रा यांचा ‘दौर ‘, ‘यादें फिल्मिस्तान की’ आणि ‘मुंबई मेन सिनेमा’ ह्या चारही पुस्तकांचं एकाच वेळी प्रकाशन होणार आहे.

अरुण पुराणिक यांनी १९८६ पासून महाराष्ट्र टाइम्स मधे ‘एक राग अनेक संगीतकार’ ही लेखमाला लिहून लेखन प्रवासाला सुरुवात केली. सिनेमा, संगीत आणि जूनी मुंबई हे त्यांचे विशेष जिव्हाळ्याचे विषय. गेल्या चाळीस वर्षात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना, नवशक्ती, प्रहार, वृतमानस, आदि वृत्तपत्रातून, साप्ताहिक लोकप्रभा, तारांगण, प्रीमियर, विविध दिवाळी अंकातून तसेच ‘आम्ही पार्लेकर’च्या वार्षिक अंकांमधून २००० वर लेख लिहिले आहेत तसेच, त्यांची ‘सरगम’, ‘हमारी याद आएगी’, ‘अनसंग हीरोज़’आणि ‘हरवलेली मुंबई’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

२५ डिसेंबर रोजी प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांच्या प्रस्तावना – श्रीकांत बोजेवार, निळु दामले, राजदत्त आणि सुहास बहुळकर यांसारख्या त्या त्या विषयातील जाणकार आणि तज्ञ व्यक्तींनी लिहिल्या आहेत. ‘ही सर्व पुस्तके ‘आम्ही पार्लेकर’च्या सभासदांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध होतील’ असे पुराणिक ह्यांनी ‘आम्ही पार्लेकर’शी बोलताना सांगितले.

 

 

 

Back to top