अरविंद प्रभू यांची आंतरराष्ट्रीय पिकलबॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड

अरविंद प्रभू यांची आंतरराष्ट्रीय पिकलबॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड

अरविंद प्रभू यांची आंतरराष्ट्रीय पिकलबॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष श्री अरविंद रमेश प्रभू यांची आंतरराष्ट्रीय पिकलबॉल फेडरेशनचे पुढील अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. आयपीएफचे पिकलबॉलसाठी एकमेव प्रभावी जागतिक प्रशासकीय संस्था म्हणून नाव घेतले जाते. अरविंद यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“एका आंतरराष्ट्रीय संस्थेचा अध्यक्ष होण्याचा मला पार्लेकर व भारतीय म्हणून अभिमान वाटतो. पिकलबाॅल हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा क्रिडाप्रकार आहे. त्याला आॅलिंपिक मध्ये स्थान मिळवून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे” अशा भावना अरविंद प्रभू यांनी ‘आम्ही पार्लेकर’शी बोलताना व्यक्त केल्या.
Back to top