मांजिरी वैद्य ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित
गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या उत्कृष्ट ग्रंथालय तसेच उत्कृष्ट ग्रंथ मित्र पुरस्काराचे 20 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांचे हस्ते वितरण करण्यात आले.
लोकमान्य सेवा संघ, पारले या संस्थेच्या श्री.वा. फाटक ग्रंथ संग्रहालयात ग्रंथपाल म्हणून गेली 35 वर्ष काम करणाऱ्या सौ.मंजिरी वैद्य यांना उत्कृष्ट ग्रंथ मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकूण 40 वर्ष त्या ग्रंथ संग्रहालयाच्या सेवेत आहेत. रुपये पंचवीस हजार रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
“आपल्या या प्रदीर्घ ग्रंथालयीन सेवेत मला एकही दिवस कामाचा कंटाळा आला नाही इतकं या सार्वजनिक ग्रंथालयातलं काम वेगवेगळ्या प्रकारचं आहे असं त्या म्हणतात.” ,’सेवेचे ठायी सदा तत्पर’ हे लोकमान्य सेवा संघाचे ब्रीदवाक्य आहे आणि या ब्रीदवाक्याला त्या कायम जागल्या आहेत.