विलेपार्ले पोलीसांची दैदीप्यमान कामगिरी
२२ जून रोजी गुलाब अपार्टमेंट येथे घरफोडीची घटना घडली. विलेपार्ले पोलीस स्टेशनची टीम तातडीने घटनास्थळी पोचली व निरीक्षण, जबाब, फिंगरप्रिंटस तसेच सी.सी. टिव्ही कॅमेरा फुटेज घेणे अशी सर्व कारवाई करण्यात आली. पोलीस टीमने अत्यंत बारकाईने सी.सी. टीव्ही कॅमेरा फुटेज तपासले. २२ तारखेला अगदी पहाटे कुणीतरी हॉलच्या खिडकीमधून प्रवेश केल्याचे लक्षात येताच. कॅमेऱ्यात दिसणाऱ्या व्यक्तीचे अत्यंत बारकाईने निरीक्षण करून तपासाची दिशा ठरली. बांधा, शरीराची ठेवण, चालण्याची लकब, तसेच अशा पध्दतीच्या घरफोड्या करणाऱ्या संभावित गुन्हेगाराचे नाव लक्षात आले. तो मोबाईलचा वापर करत नाही हे ही पोलिसांना माहीत असल्याने, त्याचे वास्तव्य तसेच तो व्यसनपूर्तीसाठी कुठे जाऊ शकतो याचा अंदाज घेत शोध सुरू झाला आणि सहा तासाच्या आत आरोपीला गजाआड करून, चोरलेली संपूर्ण मालमत्ता हस्तगत करण्याची अवघड कामगिरी विलेपार्ले पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस आयुक्त जॉर्ज फर्नांडीस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेणुका शुभराज बुवा, पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले, पोलीस निरीक्षक भरत गुरव, पोलीस उपनिरीक्षक जयदीप उदागे, पोलीस शिपाई संतोष कांबळे, पोलीस शिपाई सचिन पुलाते, पोलीस शिपाई सचीन राठोड. या टीमने करून दाखवली.