मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा वर्धापन दिन साजरा

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा वर्धापन दिन साजरा

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा वर्धापन दिन साजरा

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय विलेपार्ले शाखेचा वर्धापन दिन ६ फेब्रुवारी रोजी उत्कर्ष मंडळात साजरा करण्यात आला.
सुप्रसिद्ध गझलकार सदानंद डबीर यांची चारुलता काळे यांनी घेतलेली मुलाखत हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. मुलाखतीदरम्यान डबीर सरांनी गझलांचे अनेक पैलू श्रोत्यांसमोर उलगडून दाखवले. कार्यक्रमात मुं. म. ग्रं. सं. विलेपार्ले शाखेच्या कार्यवाह, प्रकाशिका, साहित्यिका लता गुठे, ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ‘आम्ही पार्लेकर’चे संपादक ज्ञानेश चांदेकर यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या विलेपार्ले शाखेच्या सभासदांच्या साहित्यकृतीला पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये निशा वर्तक व प्रशांत राऊत यांना सन्मानित करण्यात आले.

 

Back to top