संगीताच्या स्वरानंदाचा सोहळा – स्वरांगिनी म्युझिक क्लासेसचा वार्षिक कार्यक्रम

संगीताच्या स्वरानंदाचा सोहळा – स्वरांगिनी म्युझिक क्लासेसचा वार्षिक कार्यक्रम

संगीताच्या स्वरानंदाचा सोहळा – स्वरांगिनी म्युझिक क्लासेसचा वार्षिक कार्यक्रम

‘स्वरांगिनी म्युझिक क्लासेस’चा वार्षिक संगीत सोहळा २४ नोव्हेंबर रोजी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमात स्वरांगिनीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी आणि गुजराती गाण्यांच्या माध्यमातून आपली कला सादर केली. वय वर्षे ४ पासून ६५ वर्षांपर्यंतच्या विविध वयोगटातील ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी व्यावसायिक वादकांच्या साथीने आपली गाणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे निवेदन सलील कामत आणि मनीषा कामत यांनी केले. त्यांच्या हटके शैलीने आणि प्रसंगानुरूप विनोदांनी सोहळ्यात एक वेगळाच रंग भरला.
कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहानग्यांची गाणी आणि मोठ्या वयाच्या गायकांच्या सादरीकरणाने साऱ्यांनाच भावनिक केले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या चिन्मयी सुमीत यांनी सर्व कलाकारांचे मनापासून कौतुक केले आणि त्यांच्या प्रोत्साहनाने सर्वांचा हुरूप वाढला. संपदा आणि मनीष नाडकर्णी यांच्या बरोबरीने त्यांचे सुपुत्र श्रेयस यांनी यमन रागाची मेडली उत्कृष्टरीत्या सादर केली.
स्वरांगिनी म्युझिक क्लासेस गेल्या १२ वर्षांपासून विलेपार्ले पूर्व येथे हिंदुस्थानी शास्त्रीय आणि सुगम संगीताचे प्रशिक्षण देत आहे. विद्यार्थ्यांना संगीत शिकवण्याबरोबरच त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे महत्वाचे कार्य स्वरांगिनीच्या संस्थापिका संपदा नाडकर्णी नेहमीच करत असतात.

 

Back to top