डॉ. कौस्तुभ गोंधळेकर यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

डॉ. कौस्तुभ गोंधळेकर यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
कौस्तुभ द्वारकनाथ गोंधळेकर हे गेली अनेक वर्षे सौर उर्जा आणि उर्जा संवर्धन या क्षेत्रात कार्यरत आहेत. या क्षेत्रात त्यांनी अनेक नवनवीन प्रयोग करुन शोध लावले आहेत आणि त्यामुळे भारतात व परदेशी अनेक संस्थाना खूप उर्जा रोज वाचवता येते.
त्यांच्या या अविरत कार्यासाठी आणि योगदानासाठी त्यांना या आधी सुद्धा भारतात व विश्वभरात अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
या वर्षी २५ मार्च २०२३ रोजी त्यांना अमेरिकन काउन्सिल फॉर ट्रेनिंग एंड डेवलपमेंट, न्यू जर्सी, USA, इंस्टिट्यूट ऑफ एंट्रप्रेनरशिप एंड मैनेजमेंट, मिनिस्ट्री ऑफ स्मॉल एंड मीडियम एंटरप्राईजेस (MSME), आणि नीति आयोग दर्पण (भारत सरकार) कडून ‛मानद डॉक्टरेट’ (Honorary Doctorate in Business Management and Technology ) प्रदान करण्यात आली आहे तसेच त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना ‛भारत अभिमान पुरस्कार’ सुद्धा प्रदान करण्यात आला.
मंत्री मंगल प्रभात लोढा, उषा मंगेशकर, राज पुरोहित (पूर्व आमदार), बिट्टा जी (ऑल इंडिया अँटी टेर्रोरिस्म स्क्वाड प्रमुख) या मान्यवरांकडून डॉ. कौस्तुभ गोंधळेकर यांचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे गौरव करण्यात आला.
Back to top