
महिला संघात २०२४ पासून C B S C
पार्ल्यातील प्रतिथयश संस्था ‘महिला संघ’ एप्रिल २०२४ पासून सी. बी. एस. सी. बोर्डाशी संलग्न पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा सुरू करत आहे. या नवीन उपक्रमामुळे पालकांची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा पूर्ण होणार आहे तसेच सी. बी. एस. सी. बोर्डाशी संलग्न शाळेची कमतरता भरून काढणार आहे.
महिला संघ ही पूर्णपणे महिलांनी चालवलेली संस्था असून १९५२ पासून शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या मराठी व इंग्रजी माध्यमाची एस. एस. सी व आय. सी. एस. सी बोर्डाच्या शाळा तसेच एस. एन. डी. टी. विद्यापिठाशी संलग्न महाविद्यालय असे उपक्रम यशस्वीरीत्या चालवत आहे व येथून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात उतुंग कामगिरी करत आहेत. समाजाच्या विविध स्तरातून ‘महिला संघ’ या संस्थेचे कौतुक होत आहे.
महिला संघ संस्थेच्या या नवीन उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी सकाळी ९ ते १२ या वेळेत ९८२०९३९२७२/ ०२२२६१६९७४५ या नंबरवर संपर्क करा.