श्री. पार्लेश्वर व्यायामशाळेच्या मल्लखांब पट्टूना देदीप्यमान यश!

श्री. पार्लेश्वर व्यायामशाळेच्या मल्लखांब पट्टूना देदीप्यमान यश!

श्री. पार्लेश्वर व्यायामशाळेच्या मल्लखांब पट्टूना देदीप्यमान यश!

विश्व मल्लखांब संघटनेतर्फे दिनांक ९ ते ११ मे २०२३ रोजी आसाम येथे दुसऱ्या विश्व मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा पार पडल्या. सुमारे दहा देशातील १२० खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत श्री. पार्लेश्वर व्यायामशाळेचे मल्लखांब खेळाडू श्री. अक्षय तरळ यांनी वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये १०७.२४२ गुणांसह वैयक्तिक अजिंक्यपद पटकावले. तसेच महिलांमध्ये देखील श्री. पार्लेश्वर व्यायामशाळा विलेपार्ले येथील खेळाडू कु. जान्हवी जाधव हिला ८८.067 गुणांसह वैयक्तिक अजिंक्यपदाचे सुवर्णपदक मिळाले. श्री. अक्षय तरळ आणि कु. जान्हवी जाधव यांच्या यशात त्या दोघांचे मार्गदर्शक श्री गणेश देवरुखकर यांचा ही मोठा वाटा आहे. सर्व पार्लेकरांतर्फे या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन !

Back to top