पार्ले वृक्षमित्रांनी तयार केला ‘अटल हरित कोपरा’
पार्ल्यातील राममंदिर च्या बाजूला सुभाष रोड आणि तेजपाल स्कीम रोडला जोडणारी एक गल्ली आहे. या गल्लीच्या सुभाष रोड च्या कडेवर रोज कचरा टाकून लोकांनी उकिरडा तयार केला होता. पार्ले वृक्षामित्र चे सभासद अनिल खांडेकर यांनी म्युनिसिपल अधिकाऱ्यांना विनंती करून हा कोपरा स्वच्छ करून घेतला. त्यानंतर टायर्स मध्ये माती, घरचे कंपोस्ट खत भरले आणि स्वतः घरच्या बागेत तयार केलेली शोभेच्या झाडांची रोपे त्यात लावली. नियमित पाणी ,खत, माती घालणे वगैरे निगा राखून अनिल खांडेकर यांनी तिथे छान छोटासा बगीचा तयार केला. या सगळ्यात त्यांना पार्ले वृक्षमित्रचे अनिकेत करंदीकर आणि विपुल मेहता यांनी टायर व माती आणून देण्यास मदत केली. त्यांनी आजूबाजूला अश्या अजून दोन कोपऱ्यावर बगीचे तयार केले त्याला त्यांनी अटल हरित कोपरा असे नाव दिले आहे. पार्ल्यात अनेक ठिकाणी असे अटल हरित कोपरे तयार करण्याचा पार्ले वृक्षमित्र या ग्रुप चा मानस आहे.