रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आयोजित ‘कलादर्पण’ ७ आणि ८ डिसेंबर ला

रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आयोजित ‘कलादर्पण’ ७ आणि ८ डिसेंबर ला

रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आयोजित ‘कलादर्पण’ ७ आणि ८ डिसेंबर ला

‘कलादर्पण’ हा रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वरचा तरुण कलाकारांसाठी त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी आयोजित केला जाणारा एक अनोखा उपक्रम आहे. हे या उपक्रमाचे १३ वे वर्ष. ख्यातनाम तसेच हौशी कलाकारांकडून सादर केल्या गेलेल्या कलाविष्काराचा आनंद अनुभवण्याची पार्लेकरांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या उपक्रमात पश्चिम उपनगरातील अनेक स्थानिक शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होतात.

कलादर्पण या दोन दिवसांच्या उपक्रमाची दोन भागात विभागणी केली जाते.
1) डिस्प्ले आर्ट: कार्यक्रमाच्या या भागात शाळा, हौशी व व्यावसायिक कलाकार आणि सामाजिक संस्थांना त्यांच्या कलाकृती मांडण्यासाठी स्टॅाल्स दिले जातात.

२) परफॉर्मिंग आर्ट्स: कथ्थक, भरत नाट्यम, कुचीपुडी, कुठू, भांगडा, अनेकविध लोकनृत्यें. तसेच सतार, सरोद, पखवाज, बासरी, तबला, ड्रम्स, घटम अशी एकल वाद्ये किंवा जुगलबंदीचे सादरीकरण. तसेच कठपुतळी, लोकनाट्य अश्या पारंपरिक कलांचे सादरीकरण केले जाते.

यावर्षी शनिवार, ७ डिसेंबर व रविवार, ८ डिसेंबर रोजी कलादर्पणचे १३ वे पर्व हेडगेवार मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे.

Back to top