सविता दामले यांची ‘कौतुकपन्नाशी’

सविता दामले यांची ‘कौतुकपन्नाशी’

सविता दामले यांची ‘कौतुकपन्नाशी’

अनुवादिका-लेखिका-कवयित्री सविता दामले यांच्या पन्नासाव्या अनुवादित पुस्तकानिमित्ताने त्यांच्या मैत्रिणी मेधा कुळकर्णी ( माजी आकाशवाणी अधिकारी- संपर्क सामाजिक संस्थेच्या संस्थापिका ) आणि माधवी कुलकर्णी ( माजी दूरदर्शन अधिकारी ) यांनी ‘कौतुकपन्नाशी’ हा कार्यक्रम १६ जून, २०२४ रोजी संध्याकाळी अंधेरी पश्चिम , मेयर हॉल येथे आयोजित केला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुमार केतकर असून संदीप वासलेकर, माधवी कुंटे, निळू दामले, जतीन देसाई, प्रकाश अकोलकर, विजयराज बोधनकर, ज्ञानेश चांदेकर आदि मान्यवर आणि आप्त-स्नेही उपस्थित होते.
या प्रसंगी सविता दामले यांच्या लेखनातील उतारे वाचण्यात आले. तसेच मेधा कुळकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेतली. या प्रसंगी त्यांनी अरुण शेवते, सुदेश हिंगलासपुरकर, अस्मिता मोहिते, आशीष पाटकर, शरद अष्टेकर, चेतन कोळी, चंद्रकांत माणगवे, चिन्मय पंडित या प्रकाशकांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रा वाघ यांनी अतिशय नीटनेटकेपणे केले. कार्यक्रम अतिशय नीटनेटका झाला.

 

Back to top