‘श्वास’ फेम संदीप सावंत यांचा ‘या गोष्टीला नावच नाही’ हा चित्रपट 8 नोव्हेंबर पासून सनसिटीमध्ये
‘या गोष्टीला नावच नाही’ असे आगळे वेगळे नाव असणारा ‘श्वास’ फेम दिग्दर्शक संदीप सावंत यांचा सिनेमा येत्या 8 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे . एका तरुण मुलाच्या आयुष्यातील भूतकाळाचा त्याच्या वर्तमानकाळावर पडणारा प्रभाव या मूळ संकल्पनेवर आधारित हा सिनेमा आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक मोठ्या चित्रपटगृहात हा प्रदर्शित होणार आहे.
पार्ले टिळक विद्यालयाचा विद्यार्थी आणि विलेपार्ले रहिवासी संदीप सावंत यांचे नाव पार्लेकरांना नक्कीच नवीन नाही. भारतात आणि भारताबाहेर अभूतपूर्व यश मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘श्वास’ हा संदीप सावंत यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर नदी जिवंत राहावी या विषयाबरोबरीने नदी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट यावर आधारित ‘नदी वाहते’ हा त्यांचा दुसरा सिनेमा. त्यालाही महाराष्ट्रात खूप यश मिळालं.
‘या गोष्टीला नावच नाही’ हा त्यांचा आगामी चित्रपट पॅनोरमा स्टुडिओज तर्फे प्रदर्शित होत आहे. पार्ल्यातील सनसिटी या चित्रपटगृहातही याचे शोज असणार आहेत. केवळ पार्लेकर आहे म्हणून नव्हे तर एका संवेदनशील दिग्दर्शकाला प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने आपण सुजाण पार्लेकर नक्कीच हा सिनेमा बघण्यास उत्सुक असू यात शंका नाही. दिग्दर्शक संदीप सावंत यांना ‘आम्ही पार्लेकर’ परिवारातर्फे अनेक शुभेच्छा !
ट्रेलर :
Social media:
Insta – dirsandeepsawant
FB – sandeepsawantdir