‘Wellness Wednesday’ च्या १७५ व्या एपिसोड ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘Wellness Wednesday’ च्या १७५ व्या एपिसोड ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘Wellness Wednesday’ च्या १७५ व्या एपिसोड ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

केरळीय आयुर्वेदिक क्लिनिक च्या संचालिका व मुख्य चिकित्सक डॉ.देविका देशमुख (MD. Ayurved, Gold medalist) यांचा ‘Wellness Wednesday’ आयुर्वेद व फिटनेस या विषयावरील कार्यक्रमाचा १७५ वा एपिसोड बुधवार दिनांक १९ जून रोजी साजरा झाला. हा एपिसोड सर्व रसिकांना लाईव्ह स्वरूपात फेसबुक व इंस्टाग्राम वर दाखविण्यात आला. या कार्यक्रमाला उद्योजक, पत्रकार, डॉक्टर, वकील या सारख्या अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आपल्या आयुष्यातील ‘5 Star Moment’ काय असू शकते हे सुद्धा सांगितले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री विभावरी प्रधान या उपस्थित होत्या. शरीर आणि मनस्वास्थ याचा उत्तम संगम कसा साधता येईल याविषयी डॉ. देविका यांचे मार्गदर्शन सर्वांनी घ्यावे अशी सूचना त्यांनी केली. योग प्रशिक्षक श्री. शुभमश्री हे देखील या प्रसंगी उपस्थित होते. त्यांनी आपले मनोगत मांडताना आपले मन, आरोग्य व शारीरिक लवचिकता कशी जोपासावी याविषयी उत्तम मार्गदर्शन केले.

या कौतुक सोहळ्यास डॉ. देविका यांचे वडील डॉ. रमेश देशमुख व आई डॉ. शुभदा देशमुख यांनी त्यांच्या गेल्या ४० वर्षांतील आयुर्वेद क्षेत्रातील काम व अनुभव याचा उपयोग देविकाच्या जडणघडणीत कसा झाला हे मनोगतात व्यक्त केले. या १७५ व्या एपिसोड चे सूत्रसंचालन मुक्ता वीरकर- मुळ्ये यांनी केले. त्यांनी गाण्यातून दिलेल्या शुभेच्छा सगळ्यांना विशेष आवडल्या.

 

Back to top