‘पार्ले टिळक’चा स्टार्ट अप एक्स्पो

‘पार्ले टिळक’चा स्टार्ट अप एक्स्पो

‘पार्ले टिळक’चा स्टार्ट अप एक्स्पो

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनतर्फे शनिवार ४ मार्च रोजी ‘स्टार्ट अप एक्स्पो २०२३’ चे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेली नावीन्यपूर्ण उत्पादने आणि प्रोटोटाइप ठेवण्यात आले होते.
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या सेंटर ऑफ आंत्रप्रेन्युअरशिप अँड इनोव्हेशनच्या सहकार्याने या उपक्रमाचे प्रदर्शन सकाळी ९.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत चित्रकार केतकर मार्गावरील पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट च्या घैसास हॉलमध्ये भरले होते.
या प्रदर्शनाला केंद्रीय शिक्षण खात्याच्या इनोव्हेशन सेलचे असिस्टंट इनोव्हेशन डायरेक्टर दिपन साहू, गॅलक्सी सर्फेक्टंट्सचे सहसंस्थापक आणि संचालक जी. रामकृष्णन आणि ट्रान्सेंडर सर्व्हिसेसचे संस्थापक आणि अध्यक्ष समीर जोशी उपस्थित राहिले होते.
Back to top