असाही एक महिला दिवस !

असाही एक महिला दिवस !

असाही एक महिला दिवस !

‛वेल्थनेस वूमन विंग’ तर्फे ११ मार्च २०२३ रोजी ‛मी अस्मिता – स्त्रीत्वाचा गौरव’ हा कार्यक्रम एव्हियॉन हॉटेल मध्ये साजरा करण्यात आला. जवळ जवळ ९० वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला या कार्यक्रमास हजर होत्या तसेच अभिनेत्री मधुरा वेलणकर, एसीपी ज्योत्स्ना रासम, जुईली शेंडे (राजकारण), मेजर प्रियांका गुप्ता आणि एव्हिएशन मध्ये कार्यरत असलेल्या लीना जुवेकर- दत्तगुप्ता ह्या प्रमुख पाहुण्या होत्या. वेगवेगळ्या पुरुष प्रधान क्षेत्रात मर्दुमकी गाजवणाऱ्या ह्या तेजस्विनींशी वेल्थनेसच्या सीइओ सायली वेलणकर ह्यांनी संवाद साधत त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा परिचय उपस्थितांना करून दिला. ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकरांच्या हस्ते उपस्थित तेजस्विनींचा सत्कार करण्यात आला.
     
महिलांना काही प्रसंगामुळे किंवा कारणांनी आर्थिक निर्णय घ्यायची वेळ आली तर त्या सक्षम असाव्यात ह्या उद्देशाने वेल्थनेस तर्फे ‛वेल्थ ऑर्गनायझर’ चे उद्घाटन करण्यात आले आणि नारीशक्तीस ते अर्पणही करण्यात आले. नानाविध वैचारिक, मनोरंजनात्मक खेळांमध्ये सर्व सहभागी महिलांनी हिरीरीने भाग घेतला.
Back to top