प्रdha Art Studio च्या उद्घाटनासाठी विशेष पाहुण्यांची उपस्थिती

प्रdha Art Studio च्या उद्घाटनासाठी विशेष पाहुण्यांची  उपस्थिती

प्रdha Art Studio च्या उद्घाटनासाठी विशेष पाहुण्यांची उपस्थिती

कला आणि कलाकारांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन जरी कायमच सन्मानाचा असला तरी त्या कलेचं व्यवसायात रुपांतर करतांना कलेचं योग्य ते मूल्यमापन होईलच असं नाही. त्यांसाठी कलाकारांनीच आपली कला समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचं विचारातून शिल्पा आपटे आणि मेधा गलगले यांनी सुरु केलेल्या प्रdha या कलावस्तूंच्या brand ला लोकांपर्यंत पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न तर केलाच पण त्यासोबतच त्यांनी आता एक पुढचं पाऊल उचललं आहे ते म्हणजे, पार्ले येथे आर्ट स्टुडिओची निर्मिती.

सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांच्या हस्ते हल्लीच या स्टुडिओचं उद्घाटन झालं. या प्रसंगी मेधा आणि शिल्पाचं अभिनंदन करतांना सुकन्या म्हणाल्या, ‘ शिल्पा आणि मेधा या दोघींनी आपल्याकडील कला लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या ध्यासातून जे यश मिळवलंय ते फक्त स्तुत्यच आहे असं नाही तर त्यांच्या कलावस्तूंचा दर्जा आणि उपयुक्तता बघता त्याला लोकाश्रय मिळणंही तितकच अपरिहार्य आहे. ’

शिल्पा आणि मेधा यांनी घडविलेल्या वस्तू लोकांना बघण्यासाठी तसेच विक्रीसाठी त्यांच्या स्टुडीओमध्ये उपलब्ध केल्या आहेत. खाली दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर त्यांच्याशी संपर्क साधावा.

Back to top