सुरात रंगला ‛पार्ले वसंत महोत्सव’

सुरात रंगला ‛पार्ले वसंत महोत्सव’

सुरात रंगला ‛पार्ले वसंत महोत्सव’

आजच्या आघाडीच्या कलाकार गौरी पाठारे व रामांजनेय देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत पंचमीचे औचित्य साधून ‛पार्ले स्वर वसंत ’ 2023 हा चार दिवसांचा शास्त्रीय संगीत महोत्सव २६ जानेवारी ते २९ जानेवारी रोजी लक्ष्मीनारायण प्रसाद लॅान्स, पार्ले पूर्व, मुंबई येथे संपन्न झाला. महाराष्ट्र टाईम्स ह्या महोत्सवाचा मिडीया पार्टनर होते. महोत्सवाचे उद्घाटन आमदार पराग आळवणी, म.टा. चे माजी संपादक अशोक पानवलकर व प्रसिद्ध पत्रकार तसेच एबीपी माझा चे संपादक राजीव खांडेकर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाने झाले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात पं. मुकुंदराज देव यांच्या दमदार तबला एकल वादनाने व पं.रूपक कुलकर्णी यांच्या अत्यंत भावमधुर व तितक्याच ताकदीच्या बासरी वादनाने झाली. मुंकुंदराज यांनी लोकांशी उत्तम संवाद साधत लोकांची मने जिंकली तर रूपकजींच्या अत्यंत भावविभोर राग रागेश्रीच्या सादरीकरणास पं.मिथिलेश झा यांच्या तबल्याची साथ लाभली आणि त्याला रसिकांची विशेष दाद मिळाली.
             
मिरजेचे पिढीजात तानपुरा मेकर शमसुद्दीन सतारमेकर यांचा वर्षानुवर्षे उत्कृष्ट वाद्य निर्मिती करून कलेची सेवा केल्याबद्दल व कलाकरांना उत्तमोत्तम वाद्ये सातत्याने बनवून दिल्याबद्दल लौकिक आर्ट्स फाऊन्डेशन तर्फे १०००१/- रुपये देऊन गौरव करण्यात आला.
परदेशात राहूनही शास्त्रीय संगीत जोपासणाऱ्या कलाकारांना भारतात व्यासपीठ ऊपलब्ध करून देणे हे महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे आकर्षण ठरले. विश्वास शिरगावकर, श्रीवानी जडे व श्री मदन ओक ह्या अमेरिकेतील कलाकारांनी हे सत्र सजवले.
दिनांक २८ व २९ जानेवारी रोजी ह्या विनामूल्य महोत्सवाचे तिसरे व चौथे सत्र पार पडले.
महेत्सवाच्या तिसऱ्या दिवशी इंदूरच्या शोभा चौधरी यांनी रागधानी ने प्रसन्न वातावरण निर्मिती केली. त्यानंतर या सत्रातील प्रमुख आकर्षण पं. प्रवीण गोडखिंडी यांनी राग शुद्ध कल्याण गायकी अंगाने सादर करून समा बांधला. अत्यंत सुरेल, असरदार व सशक्त सादरीकरण करून लोकांची वा! वा! मिळवली .
पं. प्रसाद खापर्डे यांनी गाणे आपलेसे करून अत्यंत प्रभावी पद्धतीने सादर करुन श्रोत्यांना सुखद आनंद दिला. आवाज, लगाव, संपूर्ण सादरीकरण व लकबी ह्यांमधे हुबेहूब त्यांचे गुरू उ.राशिद खान ह्यांची प्रतीकृती दिसली.
              
त्यांनी रागा चे सादरीकरण करून तिसऱ्या सत्राची सांगता केली.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी प्रथम आदित्य मोडक यांनी राग अत्यंत सुरेल व ग्वाल्हेरी गायकी वापरून सादर केला. त्यांच्या दमदार सादरीकरणाने सुरुवात झाल्यानंतर अनुपमा भागवत यांनी शामकल्याण राग अत्यंत असरदारपणे पेश करून रसिकांची मने जिंकली. महोत्सवाची सांगता गौरीताई पाठारे यांच्या सुरेल व भावपूर्ण गायनाने झाली. राग नंद व भजन सादर करून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. आणि ‛पार्ले स्वर वसंत’ महोत्सवाला रसिकंची चांगली दाद मिळाली.
Back to top