टर्की मधे फडकली ‘तंजावूर’ची पताका

टर्की मधे फडकली ‘तंजावूर’ची पताका

टर्की मधे फडकली ‘तंजावूर’ची पताका

 

टर्की येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात तंजावूर नृत्य शाळेच्या विद्यार्थिनींना उत्कृष्ट नृत्याविष्काराचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याचे नेतृत्व तंजावूर नृत्य शाळेच्या संचालिका व ख्यातनाम भरतनाट्यम् नृत्यांगना तेजस्विनी लेले आणि ग्रीष्मा लेले यांनी केले. भरतनाट्यम् शैलीत भारतीय नृत्य पथकाने ‘कुरुवंजी’ ही नृत्यरचना सादर केली. ही रचना सादर करताना त्यात मराठमोळ्या लेझीमला गुंफून एक अभिनव FUSION सादर केले. या रचनेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावर्षीही प्रथम पारितोषिक मिळवून तंजावूर नृत्यशाळेने HAT-TRICK साधली आहे. २०१५ पासून ही नृत्यशाळा सातत्याने आंतरराष्ट्रीय नृत्यमहोत्सवात सहभागी होत आहे. २०१७ पासून तंजावूर नृत्यशाळेने स्पर्धेतही सहभागी व्हायचे ठरवले आणि प्रत्येक स्पर्धेत परितोषिकेही पटकावली. यापूर्वी २०१५ साली इटली, २०१६ साली स्पेन व २०१७ साली बल्गेरिया येथील नृत्यमहोत्सवात त्यांनी तंजावूर नृत्यशाळेच्या चमूसह भाग घेतला होता. तिथे या शाळेला ३ पुरस्कार प्राप्त झाले होते.

कोविडमुळे झालेल्या मोठ्या गॅपनंतर प्रथमच त्यांनी या आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात सहभाग घेतला. यामध्ये बल्गेरिया, तुर्की इत्यादी देशांनी सहभाग घेतला होता. युक्रेन-रशिया युद्धामुळे महोत्सव होईल कि नाही या बाबत खूपच काळजी वाटत होती.

तंजावूर नृत्य शाळेच्या ऐश्वर्या गद्रे , योहाना राजवाडे , पृथा मीठे , सई रानडे , गौरी गुंजाळ , प्रीथीका येदेरी , सांची शेट्टी , माही घुगे , स्नेहा सुभाष, आणि ख़ुशी नलावडे या १० मुली या महोत्सवात सहभागी झाल्या होत्या.

 

 

Back to top