चित्रकला हाच ध्यास

चित्रकला हाच ध्यास

चित्रकला हाच ध्यास

विलेपार्ले येथील रहिवासी चित्रकार श्री. प्रसाद वसंत माने हे चित्रकला क्षेत्रा मध्ये गेले २२ पेक्षा जास्त वर्षे कार्यरत आहेत. प्रसादना शाळेत असल्यापासूनच चित्रकलेची खुप आवड होती. त्यांनी चित्रकलेतील आपले पुढचे शिक्षण मुंबईच्या सर जे जे कला महाविद्यालयामधून पूर्ण केले. विलेपार्ले पश्चिम येथील सीएनएमएस शाळेत ते चित्रकला शिक्षक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत आहेत… विद्यार्थ्यांना कलेचे शिक्षण आणि प्रोत्साहन देत असतानाच त्यांनी आपले कला क्षेत्रातील कार्य सुद्धा सतत चालू ठेवले आहे. मुंबईच्या सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी सहित अनेक कला प्रदर्शने मुंबई, पुणे, नाशिक, जयपूर या ठिकाणी त्यांनी भरवली आहेत. तसेच जकार्ता, इंडोनेशिया इथेही त्यांच्या चित्रांचे ऑनलाईन प्रदर्शन झाले आहे. त्यांच्या प्रत्येक प्रदर्शनाला अत्यंत उत्सुर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत त्यांना अनेक सन्मानांनी पुरस्कृत करण्यात आले आहे. जर्मनी या देशाने सुद्धा त्यांच्या अप्रतिम चित्रकलेची कदर करत त्यांच्या Palm Art Award ने पुरस्कृत केले आहे.

प्रसाद माने यांना नुकताच पुण्यातील आर्ट बिटस् महाराष्ट्र ‘कला सन्मान’ हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘चित्रकला’ या कला विभागात हा राज्यस्तरीय पुरस्कार असून आर्ट बिटस् फौंडेशन, पुणे कडून कलाकारांना सन्मानित करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारामुळे चित्रकार प्रसाद माने यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

या पुरस्काराची माहिती देतांना आर्ट बिटस् पुणे या संस्थेचे संस्थापक, संचालक संतोष पांचाळ म्हणाले की एकूण सहा कला विभागात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात, त्यासाठी १५ मे ते ३१ दरम्यान महाराष्ट्रातून अनेक कलाकार दरवर्षी आपली माहिती पाठवतात. त्यातून विशेष कामाची दखल घेऊन ही निवड करण्यात येते. आर्ट बिटस् ही संस्था गेली एकवीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला अशा सर्व विभागातील कला कलाक्षेत्रातील कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे.

या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तळागाळातील कलाकारांसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठा डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. यासाठी सर्व स्तरातील कलाकारांनी या संस्थेकडे संपर्क साधावा असे आवाहन आर्ट बिटस् फौंडेशन या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top