‘साठ्ये’त माध्यम महोत्सवाचा थरार.

‘साठ्ये’त माध्यम महोत्सवाचा थरार.

‘साठ्ये’त माध्यम महोत्सवाचा थरार.

साठ्ये महाविद्यालयाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे आयोजित ‛माध्यम महोत्सव’ नुकताच उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरता गेली दहा वर्षं विभागातर्फे या महोत्सवाचं दरवर्षी नव्या संकल्पनेसह आयोजन होत असतं. ‛गीत’ ही यावर्षीच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना होती. ‛कुछ गीत,कुछ नगमे कुछ गजले’ या टॅगलाईनवर गुंफलेले विविध उपक्रम हे या तीन दिवसीय महोत्सवाचे आकर्षण ठरले.
पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी ‛बीज अंकुरे अंकुरे’ हे गीत संवादिनीवर गात अनोख्या पध्दतीने महोत्सवाचे उद्घाटन केले. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता केशव उपाध्ये यांची सन्माननीय उपस्थिती या सोहळ्यास लाभली. संगीतकार अशोक पत्की यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या अनेक लोकप्रिय गाण्यांच्या तसंच जिंगल्सच्या आठवणी ताज्या केल्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांनी दिलखुलास दाद दिली.
केशव उपाध्ये यांनी या महोत्सवाच्या अनुभवांचा व्यक्तिमत्व उभारणीसाठी पुढील आयुष्यात होणारा उपयोग विशद केला.
याच दिवशी दुरचित्रवाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’च्या कलाकारमंडळींनी महोत्सवाला भेट देत विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
संध्याकाळी गजल या गीतप्रकाराशी परिचय करुन देणारा ‛एक शाम गजलके नाम’ हा कार्यक्रम सादर झाला.त्यात ज्ञानप्रकाश गर्ग, डॉ. कमर सिद्दिकी, डॉ. झाकीर खान यांनी गजल पेश केली
महोत्सवात अभिनेत्री आदिती सारंगधर यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपले अनुभव व्यक्त केले. स्वतः अभिनय केलेल्या मालिकांची शीर्षकगीते गाऊन त्यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली.
या प्रसिद्ध व्यक्तीमत्वांच्या उपस्थितीसह ट्रेझर हंट, नृत्य,गायन, वाद्य जुगलबंदी, उत्स्फूर्त कवितालेखन, कविता पूर्ण करा,शायरी लेखन, स्टॅण्ड अप कॉमेडी, डिजीटल गेमिंग, कविता वाचन, पोस्टरमेकींग, प्रेम कविता, फोटोग्राफी, शॉर्ट फिल्म , फॅशन शो अशा विविध स्पर्धांनी महोत्सव साजरा झाला. विविध ३२ महाविद्यालयातील जवळपास १०० मुलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
महोत्सवाच्या संकल्पनेला अनुसरून विद्यार्थ्यांनी गणेश वंदना,बोबडी गवळण, उपशास्त्रीय संगीत,लावणी, दाक्षिणात्य संगीत, भूताकोला नृत्य,बॉलिवूड संगीत, नाट्य संगीत, नाटक, आणि वैविध्यपूर्ण गीत,वाद्य प्रकारांचे अतिशय प्रभावी सादरीकरण केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव राजवाडे, उपप्राचार्य डॉ.दत्तात्रय नेरकर, प्रमोदिनी सावंत,माध्यम विभाग प्रमुख गजेंद्र देवडा, सहअध्यापक रसिका सावंत, नारायण परब, स्मिता जैन, सीमा केदारे, गणेश आचवल,रश्मी वारंग यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
कोट
माध्यम विभागातर्फे माध्यम महोत्सव या वार्षिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. माध्यम आणि संस्कृती या दोहोंचा विचार करून या महोत्सवाचा विषय निवडला जातो.एक चांगला नागरिक बनण्याची तयारी,मनोरंजनासोबतच
माध्यमांच्या इतर विविध कार्यांची जाणीव आणि संघटन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो अशा भावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी व्यक्त केल्या
या महोत्सवाला माध्यम विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी भरघोस उपस्थिती नोंदवली. सार्थक डांगे, तन्मय सांडवे, अथर्व शिर्के, तन्मय जंगम, वैदेही सावंत, ओमकार डांबरे, सोहम मांढरे, निखिल नार्वेकर, अथर्व इंग्रुलकर, ऋषिकेश मुणगेकर, मनाली चव्हाण, चेतन जैस्वार, सायली अंगवळकर, तानिया गायकवाड , भक्ती गुरव , सलोनी पाटील, स्वाती पाडावे या आणि अन्य विद्यार्थ्यांनी चोख व्यवस्थापनातून महोत्सव यशस्वी होण्यास हातभार लावला. गीत या संकल्पनेचे विविध पैलू उलगडतानाच महोत्सवातून खूप सारी ऊर्जा, उत्साह अनुभवायला मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
Back to top