‘अंतरीचा ज्ञानदिवा’ चे प्रकाशन व माधुरी वैद्य (संपादिका ‘विपुलश्री’ मासिक) यांची प्रगट मुलाखत

‘अंतरीचा ज्ञानदिवा’ चे प्रकाशन व माधुरी वैद्य (संपादिका ‘विपुलश्री’ मासिक) यांची प्रगट मुलाखत

‘अंतरीचा ज्ञानदिवा’ चे प्रकाशन व माधुरी वैद्य (संपादिका ‘विपुलश्री’ मासिक) यांची प्रगट मुलाखत

श्रीमती माधुरी वैद्य संपादित ‘विपुलश्री’ या मराठी मासिकाने गुणवत्तापूर्ण मासिक अशी ओळख वाचकांच्या मनात निर्माण केली आहे. गेले २४ वर्षे प्रकाशित होत असलेल्या ‘विपुलश्री’ या मासिकाने करोनाकाळातही छापील स्वरूपातच अंक काढले आणि सर्वदूर वितरीतही केले. या मासिकाचे वाचक जगभर पसरले आहेत याचे मोठे श्रेय श्रीमती वैद्य यांना जाते. त्यांच्या याच कार्याची दखल घेण्यासाठी दिनांक १० जून २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता ‘साठ्ये कॉलेज ऑडीटोरीयम’ येथे जेष्ठ व श्रेष्ठ लेखिका श्रीमती माधवी कुंटे या प्रगट मुलाखत घेणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते श्रीमती वैद्य यांचा सत्कारही होणार आहे. याशिवाय श्री आशुतोष उकिडवे यांचे शिक्षणक्षेत्रातील अनुभव सांगणाऱ्या ‘अंतरीचा ज्ञानदिवा’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवर पाहुण्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर (निवृत्त, मुंबई उच्च न्यायालय) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यावेळी पुस्तकातील काही लेखांचे अभिवाचनही होणार आहे.
Back to top