साठये महाविद्यालयात मल्टी स्पोर्ट टर्फ आणि बास्केटबॉल कोर्ट

साठये महाविद्यालयात मल्टी स्पोर्ट टर्फ आणि बास्केटबॉल कोर्ट

साठये महाविद्यालयात मल्टी स्पोर्ट टर्फ आणि बास्केटबॉल कोर्ट

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या साठये महाविद्यालयाने असोसिएशनच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मल्टी स्पोर्ट टर्फ आणि स्टँडर्ड बास्केटबॉल कोर्ट विकसित केले आहे. या टर्फचा उद्घाटन सोहळा दिनांक १८ मे २०२३ रोजी पार पडला. या सोहळ्याला ४०० खेळाडूंसोबत PTVA संचालक मंडळाचे सदस्य, संस्थेच्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य , शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, प्राचार्य आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे अध्यक्ष श्री अनिल गानू , मानद सचिव श्री.दिलीप पेठे आणि साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी साठये महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानाचे आधुनिकीकरण करण्याचे ठरविले जे सर्व हंगामात वापरता येईल. एक बहुउद्देशीय योजना आखून महाविद्यालयातील मैदानात टर्फ तयार करण्यात आले. या टर्फसाठी साठये महाविद्यालयाचे क्रीडा संचालक श्री. अभितसेन वर्तक यांनीही वेळोवेळी मार्गदर्शन केले. पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमचा एक भाग म्हणून स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीम बांधून समाज आणि पर्यावरणासाठी साठये महाविद्यालयाने मोलाचे योगदान दिले आहे. सदर मल्टीस्पोर्ट टर्फमध्ये दोन व्हॉलीबॉल कोर्ट, कबड्डीची दोन मैदाने आणि एक खो खो मैदाने अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर या टर्फवर फुटबॉल, हँडबॉल, बॅडमिंटन, हॉकी हे खेळ खेळता येतील. तसेच साठये महाविद्यालयात स्वतंत्र बास्केटबॉल कोर्टही तायर करण्यात आले आहे. बास्केटबॉल कोर्टवर लॉन टेनिस तसेच ओपन एअर बॅडमिंटनही खेळता येईल.
Back to top