हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

श्री जय हनुमान व्यायाम शाळा, रामवाडी या संस्थेमार्फत प्रतिवर्षी साजरा होणारा श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिनांक ६ आणि ७ एप्रिल असा दोन दिवसीय उत्सव साजरा करण्यात आला. यंदा संस्थेचे ६८ वे वर्ष असल्याने उत्सवाच्या पहिल्या दिवशी हनुमान जन्मोत्सव व सत्यनारायण महापूजा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दोन दिवसीय सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली असून तब्बल ५००० भाविकांनी हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला. ‛राम सेतू देखावा’ हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण होते.
गेल्या ६८ वर्षांपासून विलेपार्ले तसेच मुंबई उपनगरात नावाजलेल्या संस्थांमध्ये जय हनुमान व्यायाम शाळा, रामवाडीचे नाव गणले जाते. संस्थे मार्फत प्रतिवर्षी अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, गरजू होतकरू मुलांना अल्पदरात वह्या वाटप या सारखे उपक्रम गणेश उत्सवात हेडगेवार मैदानात संपन्न होतात तसेच हजारो गणेश मूर्तीच्या विसर्जनाची सेवा देखील संस्थेचे कार्यकर्ते गेली 14 वर्ष विनामूल्य करत आहेत. कोरोना काळात देखील संस्थेमार्फत मोफत अन्नदान केले गेले.
“श्री जय हनुमान व्यायाम शाळा, रामवाडी या आमच्या संस्थे मार्फत प्रतिवर्षी साजरा केला जाणारा हनुमान जन्मोत्सव सोहळा यंदाही भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही संपूर्ण पार्लेकरांनी या सोहळ्याचा आनंद लुटला. दरवर्षी आपल्या संस्थेमार्फत हनुमान जन्मोत्सव सोहळ्या व्यतिरिक्त देखील वर्षभर अनेक सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांचे आयोजन केलं जातं. ” अशी भावना संस्थेचे सचिव सिद्धेश चंद्रकांत पवार यांनी सांगितले.
Back to top