‘बालजल्लोष’ कार्यक्रम आनंदात व उत्साहात साजरा.

‘बालजल्लोष’ कार्यक्रम आनंदात व उत्साहात साजरा.

‘बालजल्लोष’ कार्यक्रम आनंदात व उत्साहात साजरा.

बाल दिनाचे औचित्य साधून विलेपार्ले येथे दुभाषी मैदान (प्लेग्राउंड) साबरी प्रतिष्ठानच्या वतीने ९ ते १४ या दिवशी बाल जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक लहानमुलं मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सहभागी झाले होते. तसेच कार्यक्रमादरम्यान झालेल्या किल्ले स्पर्धा, वेशभुषा, एकपात्री, रस्सी खेच, लंगडी, दोरी उडी, सूर्य नमस्कार, चित्रकला, नृत्यस्पर्धा, पत्र लेखन तसेच विशेष आकर्षण कुस्ती स्पर्धा अशा स्पर्धांमध्ये लहानग्यांसह ज्येष्ठांनीही सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमात श्री संजय उपाध्ये, श्री सुहास आडीवलेकर, श्री अवधूत वाघ ,विणा भागवत,
श्री.संदीप दळवी, डॉ. शशिकांत वैद्य , श्री. राजेश टेके, श्री. बाळा सरोदे, श्री. मिलिंद करमळकर, स्मिता पुराणिक, अमित परसतवार ,सहदेव सावंत, दीपक परब इत्यादी मान्यवर लाभले होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.याचबरोबर देश भक्तीपर गीते, मलखांब, रॅपलिंग झिपलाइन, दीपोत्सव या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच ग्रामीण आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना आपल्या मार्फत मदत मिळण्यात यावे यासाठी आनंदाचे विद्यालय सुरू करण्यात आले आहे. मागील १५ वर्षांपासून सतत पार्ल्यात बाल जल्लोषचे आयोजन करण्यात येते, या संपूर्ण कार्यक्रमात साबरी परिवारातील पराग सुर्वे,तेजस पाटील, याद्निक चव्हाण, संतोष शिदम, विनायक घाणेकर, दीपक नेवरेकर, संदीप शिदम, मंगेश मामा घाडगे,राहुल चव्हाण, सितेश वारिसे, ऋषिकेश, दिवेश घाडगे,अंकित नाईक,सुयोग वैद्य,सुरेश बोरुले,विशांत जाधव, सचिन सुर्वे,दत्ताराम जाधव,नूतन सुर्वे, राधिका चव्हाण, अपूर्वा यादव, निहारिका घोलम,स्नेहल शिदम, सूरज शिदम, यश सुर्वे, विशेष अशी कामगिरी केली आहे.

Back to top