‘ग्राहक पेठ’ लघुउद्योजक, गृहउद्योजक व महिला उद्योजकांच्या हक्काची जागा

‘ग्राहक पेठ’ लघुउद्योजक, गृहउद्योजक व महिला उद्योजकांच्या हक्काची जागा

‘ग्राहक पेठ’ लघुउद्योजक, गृहउद्योजक व महिला उद्योजकांच्या हक्काची जागा

लोकमान्य सेवा संघ, पारले या संस्थेची रेखा चिटणीस पुरस्कृत ३९ वी ग्राहकपेठ शुक्र दि. २७ ऑक्टो ते रवि. दि. ५ नोव्हेंबर या कालावधीत संपन्न झाली. लघुउद्योजक, गृहउद्योजक व विशेषतः महिला उद्योजकांना या ग्राहकपेठेमधे संधी दिली जाते. खाद्यपदार्थापासून दागिन्यांपर्यंत विविध वस्तूंचे सुमारे १२५ गाळे असलेली ही ग्राहकपेठ संस्थेचे स्वा. सावरकर पटांगण व संस्थेच्या इमारतीतील गोखले सभागृह, पु. ल. देशपांडे सभागृह व काळे सभागृह येथे भरली होती. लोकमान्य सेवा संघाच्या या ग्राहकपेठेत नाशिक, सांगली, चिपळूण, माथेरान इत्यादी ठिकाणच्या गाळाधारकांनी भाग घेतला होता. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील प्रांतातील उद्योजकही सहभागी झाले होते. मुंबई उपनगरात विशेष प्रसिद्ध असलेल्या या ग्राहकपेठेत शेकडो लोकांनी खरेदीचा नंद घेतला. अनेक मान्यवरांनीही ग्राहकपेठेस भेट दिली. त्यात महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री व मराठी भाषा राज्यमंत्री मा. श्री. दीपक केसरकर यांनी रविवार दि. ५ नोव्हेंबरला संस्थेच्या ग्राहकपेठेस सदिच्छा भेट दिली. गाळाधारकांना प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिके दिली जातात. या वर्षीचा हा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दि. २ नोव्हेंबर रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री. मुकुंद चितळे व विलेपार्ल्याचे लोकप्रिय माजी नगरसेवक श्री. अभिजित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ग्राहकपेठेच्या शिस्तबद्ध योजनामुळे व ग्राहकांच्या प्रतिसादामुळे गाळाधारक समाधानी होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

Back to top