दायित्व समितीचे ‘लिटल वॉरियर्स’ आणि ‘मेरी समॅरिटन्स’ शिबिरांसह सातत्यपूर्वक योगदान

दायित्व समितीचे ‘लिटल वॉरियर्स’ आणि ‘मेरी समॅरिटन्स’ शिबिरांसह सातत्यपूर्वक योगदान

दायित्व समितीचे ‘लिटल वॉरियर्स’ आणि ‘मेरी समॅरिटन्स’ शिबिरांसह सातत्यपूर्वक योगदान

दायित्व ही SVKM’S डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी स्थापन केलेली एक सामाजिक संवेदनशील समिती आहे. नावाप्रमाणेच दायित्व ही एक जबाबदारी आहे. ‘दायित्व’ ही समिती अनेक स्वयंसेवकांसह वर्षभर समाजकार्य राबवते.

या समितीने १८ डिसेंबर २०२३ रोजी सेंट ज्युड्स इंडिया चाइल्डकेअर टाटा मेमोरियल, शिवडी येथे ‘लिटल वॉरियर्स’ हे शिबिर आयोजित केले होते. समितीच्या सदस्यांना कर्करोगग्रस्त शूर मुलांशी संपर्क साधण्याची संधी मिळाली. जवळपास ४५ मुले तिथे उपस्थित होती. त्यांचा उत्साह वाढवणे, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे आणि ते खरे योद्धे आहेत याची त्यांना जाणीव करून देणे यावर या कार्यक्रमाचा भर होता. या समितीने मुलांसाठी गायन, ओरिगामी आणि खेळ यांसारख्या विविध मजेदार कार्यक्रम आयोजित केले होते. सदस्यांनी मुलांच्या क्रिएटिव्ह अभिव्यक्तीसाठी डायरी, ड्रॉइंग बुक्स आणि क्रेयॉन अश्या भेट वस्तू दिल्या. त्यांचे पोषण आणि आरोग्य वाढवण्यासाठी ५० केळी आणि २५ किलो संत्री यांसारखी फळे वाटली. कर्करोगग्रस्त मुलांनी सभासदांना फुले व बुकमार्क्स देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करून सकारात्मकतेने कार्यक्रमाची सांगता केली .

याचप्रमाणे दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी दायित्व समितीने मातृभूमी स्कूल, जानुपाडा, कांदिवली पूर्व येथे ‘मेरी समॅरिटन्स’ हे शिबिर आयोजित केले होते. आदिवासी पाड्यातील आदिवासी मुलांसोबत नाताळ साजरा करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

समितीच्या सदस्यांनी नाताळसाठी शाळा सुशोभित केली आणि मुलांसाठी मुखवटा बनवणे, टॅटू पेंटिंग, नृत्य यांसारख्या विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन केले. सुमारे ५० ब्लँकेट्स, क्रेयॉन आणि इतर स्टेशनरी भेटवस्तूं दिल्या.

 

 

Back to top