गौरी पाठारे यांची ‘गानसरस्वती’ पुरस्कारासाठी निवड

गौरी पाठारे यांची ‘गानसरस्वती’ पुरस्कारासाठी निवड

गौरी पाठारे यांची ‘गानसरस्वती’ पुरस्कारासाठी निवड

१० मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता डीएमसीसीसभागृहात दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा २०२३ सालचा ‘गानसरस्वती’ हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या पुरस्कारासाठी विख्यात गायिका गौरी पाठारे यांची निवड झाली आहे. गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा वार्षिक पुरस्कार त्यांचे ज्येष्ठ शिष्य डॉ. अरुण द्रविड यांनी प्रायोजित केला आहे.
५० वर्षांखालील हिंदुस्थानी शास्त्रीय गायकाला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार सोहळा आणि त्यानंतर गौरी पाठारे यांची ९० मिनिटांची छोटीशी मैफल होणार आहे.
गौरी पाठारे यांना आतापर्यंत सूरमणी पुरस्कार, पं. भीमसेन जोशी यांच्या स्मरणार्थ ‘स्वरभास्कर’ पुरस्कार, श्री सीताराम दीक्षित पुरस्कार, आदित्य विक्रम बिर्ला ‘कला किरण पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Back to top