२२ व्या पार्ले महोत्सवाचे शानदार आयोजन

२२ व्या पार्ले महोत्सवाचे शानदार आयोजन

२२ व्या पार्ले महोत्सवाचे शानदार आयोजन

सलग २१ वर्षे सुरू असलेल्या ‘पार्ले महोत्सव’ ची मालिका अखंड सुरू ठेवत ह्याही वर्षी २२ वा पार्ले महोत्सव मोठ्या दिमाखात साजर झाला. आमदार पराग अळवणी ह्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित विलेपार्ले कल्चरल सेंटर ह्या धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्गत नोंदणीकृत सामाजिक संस्थेतर्फे सदर महोत्सवाचे भव्य आयोजन वामन मंगेश दुभाषी मैदान व साठये महाविदयालयात करण्यात आले होते.

कबड्डी, व्हॉलिबॉल, बॉक्स क्रिकेट, शरीर सौष्ठव, चित्रकला, बुद्धीबळ, होम मिनिस्टर, ओव्हर आर्म क्रिकेट, हस्ताक्षर, मेहंदी, रांगोळी, ज्येष्ठ नागरिक इ. स्पर्धांमधून सुमारे १५ हजारहून अधिक स्पर्धकांनी ह्या सात दिवसीय महोत्सवामध्ये सहभाग घेतला. ‘वीरा ग्रुप’ ने प्रमुख प्रायोजिकत्व स्विकारलेल्या ह्या वर्षीच्या महोत्सवाला ‘अर्काडे ग्रुप’ ‘झी इन्फ्रा’ ‘युनिव्हर्सल ग्रुप’ आदिंनी देखील महत्त्वपूर्ण सहयोग दिला.

मुंबई उपनगराचे पालकमंत्री मा. श्री. मंगलप्र‌भात लोढा ह्यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. महोत्सव काळात खासदार पूनम महाजन, विधानसभा अध्यक्ष ना. राहुल नार्वेकर, मुंबई भा. ज. पा. चे अध्यक्ष ऍड. आमदार आशिष शेलार हयांसहीत साहित्य, नाट्य सामाजिक व अभिनय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडापटुंची विशेष उपस्थिती लाभली.

महोत्सवात सहभागी सर्व स्पर्धाकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले तर विजयी स्पर्धक व संघ ह्यांना चषक, मेडल्स व रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. केवळ मुंबईपुरता मर्यादित न राहिलेल्या ह्या महोत्सवात संपूर्ण देशातून सहभाग घेण्यासाठी संघ व स्पर्धक येतात हीच ह्या महोत्सवाची यशस्वीता ठरते.

“दर वर्षी प्रगतीचे एक एक पाऊल पुढे टाकत मार्गक्रमण करीत असलेल्या ह्या महोत्सवाच्या घवघवीत यशाचे संपूर्ण श्रेय हे कार्यकर्त्यांचे निरापेक्ष योगदान, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उद्देशाला महत्व देत खंबीरपणे पाठीशी उभे रहाणारे प्रायोजक ह्या त्रिसूत्रीला जातं.” असं निखळ प्रतिपादन महोत्सवाचे जनक पराग अळवणी ह्यांनी करीत २३ व्या महोत्सवाला अधिक उत्तुंग करण्याचा मानस बोलून दाखविला.

 

 

Back to top