नव वर्षात महिला संघ शाळेत ‘अक्षरसरिता’ च्या वाचन वर्गाची सुरूवात.

नव वर्षात महिला संघ शाळेत ‘अक्षरसरिता’ च्या वाचन वर्गाची सुरूवात.

नव वर्षात महिला संघ शाळेत ‘अक्षरसरिता’ च्या वाचन वर्गाची सुरूवात.

सोमवार दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी महिलासंघ मराठी माध्यमाच्या शाळेत ‘अक्षरसरिता’ अंतर्गत इयत्ता सातवीच्या दोन वर्गांमध्ये ‘अक्षरसरिता’ चे वाचन वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
या अनौपचारिक सोहळ्याच्या उद्घाटना दिवशी शाळेच्या मुख्याध्यापिका गौरी सावंत ह्यांनी मुलांना वाचनाचे महत्व सांगितले तर ‘अक्षरसरिता’ च्या डायरेक्टर शोभा बोंद्रे ह्यांनी कविता वाचन करून मुलांना थेट पुस्तकांच्या जगात नेले.
पुणे परिसरात ‘अक्षरसरिता’ तर्फे दर आठवड्याला विविध शाळांमध्ये मिळून एकूण ४० वाचन वर्ग चालविले जातात.
आता नविन वर्षाच्या सुरुवातीला ही संख्या वाढून ४२ झाली आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत गटातील मुलांना अवांतर वाचनाचा भरपूर लाभ घेता यावा, हे ‘अक्षरसरिता’ चे प्रमुख उद्दिष्ट आहे.
त्यासाठी म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या तशाच मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये ‘वाचनाचा तास’ हा उपक्रम गेली बारा वर्षे ‘अक्षरसरिता’ च्या माध्यमातून राबवला जात आहे.

Back to top