रवी महाजन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स – बदलत्या नाशिकची नव्याने मांडणी करणारं नाव

रवी महाजन बिल्डर्स अँड  डेव्हलपर्स – बदलत्या नाशिकची नव्याने मांडणी करणारं नाव

 

रवी महाजन बिल्डर्स अँड  डेव्हलपर्स – बदलत्या नाशिकची नव्याने मांडणी करणारं नाव

रवी महाजन बिल्डर्स आणि डेव्हलपर्स म्हणजे बदलत्या नाशिकची नव्याने मांडणी करणारं नाव.नव्या युगाची, नव्या घाटणीची, नव्या गरजांची पूर्तता करणारी घरे देणारं नाव.

गेल्या 32 वर्षांहून अधिक काळापासून 70 हून अधिक प्रोजेक्टच्या बांधकामाचा अनुभव असलेले व 3000 हून अधिक परिवाराचा हिस्सा झालेल्या विश्वासाचं प्रतिक.

काल काहीच नव्हतं इथे, आता बघ किती बदललयं…असं नाशिकला आलेला प्रत्येक जण सांगतो. आणि ते खरं आहे. नाशिक बदलतयं, वेगानं. अगदी सगळ्याच दिशांना वाढतयं. अनेक शहरे जोडणारी विमान सेवा असो वा भारतातल्या महत्त्वाच्या मोठ्या शहरांना थेट जोडणारे रस्ते असो, होऊ घातलेला आय.टी. पार्क असो वा मोठ्या ब्रॅण्डची पंचतारांकीत हॉटेल्स. आता नाशिक कुठेही थांबायला तयार नाही, थांबणारही नाही…

अशा नाशिकमध्ये गेल्या 3 दशकांहून अधिक काळापासून प्रचंड मेहनतीनं स्वत:चा ब्रॅण्ड उभा करणं सोपं काम नव्हतंच कधी. तेही बांधकाम क्षेत्रात जिथे ग्राहकांच्या स्वत:च्या घराबद्दल असणाऱ्या कल्पना, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत कटाक्षाने बघितली जाणारी क्वॉलीटी, खूप सगळ्या अपेक्षां असतात, त्या पूर्ण करणं, त्यांच्या विश्वासाला जागणं, त्यांना आपल्या कुटुंबाचा सदस्य समजणं आणि हे सगळं साध्य करणं, टिकवणं आणि सतत वाढवतं नेणं हे अवघड शिवधनुष्य रवी महाजनांनी लिलया उचलले आहे.

शिक्षणाने स्वत: सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलेले असल्यामुळे प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी स्वत: तपासून मगच त्याची निवड करणं, रोजच्या रोज प्रत्यक्ष साईटवर जाऊन तेथील कामे समजाऊन सांगणं, साईटवरील प्रत्येकाशी कामाची चर्चा करणं, अडचणी सोडवणं हे नियमितपणे ठरलेलचं. त्यामुळेच रवी महाजन म्हणजे क्वॉलीटी कामं ही ओळख ते निर्माण करू शकले. यामुळेच ’आम्रपाली’ या प्रोजेक्टला त्या वर्षाचा ’बेस्ट बिल्डींग ऑफ दि इअर’, ’अमोदिनी’ प्रोजेक्टला अल्ट्राटेक सिमेंटचा मानाचा ’बेस्ट कन्स्ट्रक्शन क्वॉलीटी ॲवॉर्ड’ तसेच ’आराध्या’ या प्रोजेक्टला ’बेस्ट बिल्डींग ऑफ दि इअर’ हा पुरस्कार मिळाला आहे.

पुढील 2 ते 3 दशकांचा विचार करुन निवडलेले प्रत्येक लोकेशन, तेथे साकारण्यात येणारा प्रत्येक प्रकल्प तेथील गरजांप्रमाणे डिझाईन केलेला असतो. तेथे येऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन बनविलेला प्रोजेक्ट व दर्जेदार घरासोबत जीवनासाठी लागणाऱ्या अनेक ॲमेनिटीजने समृध्द असलेली ही घरे म्हणूनच नाशिककरांनाही मनापासून आवडली आहेत. आज व्यवसायाचा वाढता भार संभाळण्यासाठी दोन्ही मुले, सुनबाई त्यांना मदतीसाठी सदैव तयार व तत्पर आहेत. अनेक वर्षांपासून सोबत केलेला सुशिक्षित व प्रामाणिक स्टाफ हे काम चोख सांभाळत आहेत. आज एकाच वेळी 3 भव्य प्रोजेक्टस् सुरु असून त्यात 600 हून अधिक फ्लॅटची कामे सुरु आहेत. त्यात सर्वांना सहज आवडतील व परवडतील असे काठे गल्लीतील ’आनंदवन’, इंदिरानगरमधील ’अमृतधारा’ आणि लक्झरीअस प्रोजेक्टमध्ये अभिमानाने नावं घेतले जाईल असा आर. डी. सर्कल, सद्गुरू नगर जवळील 4 व 5 बि.एच.के. चा ’अँटोनिया’.

आनंदवन :

काठेगल्लीच्या छानश्या लोकेशनवर उभा राहतोयं भव्य प्रोजेक्ट ’आनंदवन’, त्रिकोणी गार्डनजवळ, शांत रम्य ठिकाणी अत्याधुनिक सुखसोईंने सज्ज आनंदवन या परिसराची नवी ओळख बनू पाहतो आहे. रोजच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गरजा अगदी हाकेच्या अंतरावर असणारा प्रोजेक्ट. 2 व 3 बि.एच.के. स्पेशिअस लक्झरी तीही सर्वांना सहज परवडेल अशा दरात. बस स्टॉप, रिक्षा स्टॅण्ड, जवळच द्वारका स्टॉप, मुंबई आग्रा हायवे, पूना हायवे, रंगूबाई जुन्नरे हायस्कुल, पोद्दार स्कुल, नामांकित हॉस्पिटल्स्, पंचवटी, तपोवन, रेल्वे स्टेशन सगळं अगदी काही मिनिटांवर. सुंदर, प्रशस्त घरासोबत मुलांना खेळण्याची जागा, नेट क्रिकेट, पार्टी लॉन, क्लब हाऊस, इनडोअर गेम्स, ग्रिन जिम, मल्टीपर्पज कोर्ट, सिक्युरिटी केबिन व पुरेसं पार्कींग अशा 22 हून अधिक ॲमेनिटीज येथे आहेत. काम वेगात सुरु आहे. सॅम्पल फ्लॅट तयार आहे.

अमृतधारा :

इंदिरानगरची शान वाढविणारा हा प्रोजेक्ट. तसं इंदिरानगर त्यापैकीच एक. सुसंस्कृत, सुशिक्षित, संस्कारी इंदिरानगर आज कॉलेज रोड, गंगापूर रोडशी स्पर्धा करतयं. शॉपिंग मॉल असो वा सुपर मार्केट, शाळा, कॉलेजेस, इंजिनिअरींग कॉलेज, बस व रिक्षाच्या सततच्या फेऱ्या, पेट्रोल पंप, फुड जॉईंटस्, हॉस्पिटल्स… काहीही विचारा, इथे आहे सगळचं. तसं इंदिरानगर सगळ्यांच्याच सोईचं. अगदी 700 मी. वर राजसारथी सोसायटी तर डिमार्ट मेगा मॉल व अशोका मेडिकेअर स्टार हॉस्पिटल अवघ्या 500 मी.वर म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर. तसेच रेल्वे स्टेशनवर जायचे असो वा बस स्टँडवर, औद्योगिक नगरीत जायचे असो वा थेट शहरातल्या कोणत्याही भागात. इथून सगळचं सोईचं. प्रत्येकाला सुखाचा निवारा देणारं अगदी नावाप्रमाणं, जीवनाला संजीवनी देणारा प्रोजेक्ट. कालच्या पेक्षा आज अधिक चांगली लाईफस्टाईल हवी असेल त्या सर्वांसाठी. मोठं, छानं, देखणं घर तेही प्रत्येक खिशात सहज मावणारं. सर्वांची प्रायव्हसी जपणारं, कुटुंबातील प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करणारं घर.

अँटोनिया :

सद्गुरु नगर, गोविंदनगर, आर. डी. सर्कलजवळ, सिटी सेंटर मॉल लिंकरोडवर साकारणारा, हा रवी महाजनांचा सुपर लक्झरिअस 4 व 5 बि.एच.के.चा ड्रिम प्रोजेक्ट ’अँटोनिया’. लक्झरीची व्याख्या बदलणारा, शहराची शान वाढवणारा आणि इथे रहायला येणार्‍या प्रत्येकाला अभिमान वाटेल व कोणालाही आपलं घर दाखवावेसं वाटेल असा प्रोजेक्ट. सर्व बाजूने ओपन असणारे व आकाशाशी स्पर्धा करणारे स्काय व्हिलाजचे टॉवर्स, भरपूर प्रकाश, खेळती हवा तुम्हाला जगण्याचा वेगळाच आनंद देतील. येथे होणाऱ्या सुपर लाईफस्टाईल ॲमेनिटीज तुम्हाला आयुष्यभर आनंद देणार्‍या ठरतील. आम्ही येथे काय काय देतो आहे ते प्रत्यक्ष पहा, त्यामुळे जर तुम्ही स्वत:चा बंगला बांधण्याचा करीत असाल तर तो विचार सोडा, येथे रहायला या, तुम्हाला हे घर बंगल्यापेक्षा कितीतरी अधिक लक्झुरीअस सुविधा व सुरक्षा देईल व सुसंस्कृत सोबत आणि तुमचे स्टेटस् सिंबॉल बनेल.

आम्हाला नक्की भेटा कारण घराकरिता पैसे तर कुठेही द्यायचेत आहे परंतू योग्य व आयुष्यभर साथ देणाऱ्या ठिकाणी तुमची आयुष्यभराची पुंजी लावणे व काळाबरोबर त्याचे मुल्य वाढत जाणे केव्हाही योग्य असे बिल्डर श्री रवी महाजन यांनी आवर्जून सांगितले.

या लेखात सांगितल्या प्रमाणे नाशिक मध्ये त्यांचे खूप चांगले प्रोजेक्ट्स सध्या सुरु आहेत. पार्लेकर नेहमीच पुणे नाशिक या ठिकाणी आपले वीकएंड होम शोधत असतात. म्हणूनच या लेखाद्वारे तुमच्या साठी काही उत्तम पर्याय येथे दिले आहेत. दिलेल्या क्रमांकावर फोन करून आपण याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊ शकाल.

अधिक माहितीसाठी संपर्क : 7304730483
Website: www.ravimahajan.com

Back to top