विद्या पेठे यांच्याकडून वाचकांना नवीन वर्षाची साहित्यिक भेट

विद्या पेठे यांच्याकडून वाचकांना नवीन वर्षाची साहित्यिक भेट

विद्या पेठे यांच्याकडून वाचकांना नवीन वर्षाची साहित्यिक भेट

२४ जानेवारी रोजी नाडकर्णी सभागृह येथे प्रसिद्ध लेखिका विद्या पेठे यांची ‘ललित रंग’ आणि ‘गोंधळात गोंधळ’ (बालनाटिका) ही दोन पुस्तकं ज्येष्ठ लेखक व समीक्षक अशोक बेंडखेळे यांच्या हस्ते प्रसिद्ध झाली. पुस्तकाचे प्रकाशन करताना श्री बेंडखळे म्हणाले, “लेखिकेची संवेदनशीलता, प्रेमळ स्वभाव, बहुश्रुतपणा या साऱ्याचे दर्शन बारा ललितलेखांमधून घडते.” याचबरोबर त्यांनी ‘वेणी’ आणि ‘माझ्या ग अंगणी’ या दोन लेखांबद्दल सविस्तर विवेचन देखील केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्पना कशाळकर यांनी केले. त्याचबरोबर संघटनेचे अध्यक्ष विजय पंतवैद्य, कार्यवाह प्रतिभा सराफ आणि सोबतीचे अनेक सभासद प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते.

इसवी सनापूर्वीचे पाच, सहा सहस्त्रक ते एकविसाव्या शतकातील चालू वर्ष इतका मोठा कालपट लेखिकेने या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. जीवनातील अनेक अंगांना स्पर्श करणारं हे पुस्तक रंजक, औत्सुक्य वाढविणारं आहे. ओघवत्या शैलीत लिहिलेल्या बारा लेखांचा हा संग्रह म्हणजे चतुरस्र लेखिका विद्या पेठे यांच्याकडून वाचकांना मिळालेली नवीन वर्षाची भेट आहे. या पुस्तकातील कोणताही लेख वाचायला घ्यावा व पुस्तक आवडीने पूर्ण वाचले जाणार यात शंकाच नाही.

 

Back to top