भारताच्या तिहेरी यशात प्रबोधन क्रिडा संकुलाचा मोलाचा वाटा

भारताच्या तिहेरी यशात प्रबोधन क्रिडा संकुलाचा मोलाचा वाटा

भारताच्या तिहेरी यशात प्रबोधन क्रिडा संकुलाचा मोलाचा वाटा

प्रबोधनकार क्रीडा संकुल येथे खऱ्या अर्थाने पिकलं बॉल चे तंत्रशुद्ध ट्रेनिंग दिले जात आहे. याची पोचपावती म्हणजे आशियाई पिकल बॉल स्पर्धेत भारताला मिळालेले तिहेरी यश. नुकत्याच पार पडलेल्या पिकलं बॉल आशियाई स्पर्धेत भारताने ३ सुवर्ण २ रौप्य आणि २ कास्य पदकांची कमाई करत पदक तालिकेत अव्वल क्रमांक प्राप्त केला. गेली जवळपास ३ वर्ष आशियाई पिकलं बॉल स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवण्यात भारतीय खेळाडू यशस्वी ठरले आहेत विविध वयोगटात होत असलेल्या या स्पर्धेत भारताकडून खेळताना खुल्या पुरुष दुहेरी गटात विलेपार्लेतील मयूर पाटील याने सुवर्ण पदक पटकावले तर वंशिक कपाडिया आणि तेजस महाजन या जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर ५०+ वयोगटात पुरुष एकेरी स्पर्धेत संदीप तावडे यांनी उत्तम कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. मिश्र दुहेरीत आपला दबदबा कायम ठेवत वंशिक व वृषाली ठाकरे या जोडीने या भारतीय संघाच्या यशामागे भारतीय पिकलं बॉल संघटनेचे अध्यक्ष श्री.अरविंद प्रभू आणि इतर पदाधिकारी यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे पिकलं बॉल हा तुलनेने नवीन आलेल्या खेळात आज श्री. अरविंद प्रभू यांच्या नेतृत्वा खाली देशाला मोठे यश प्राप्त होत आहे लवकरच हा खेळ ऑलिम्पिक स्पर्धेत समाविष्ट होईल असा विश्वास जागतिक संघटनेचे सुद्धा अध्यक्ष असलेले श्री.अरविंद प्रभू यांनी व्यक्त केला.

 

Back to top