अलका काटदरे यांच्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा
कवयित्री अलका काटदरे यांच्या ‘प्रसव’ या पहिल्या वहिल्या कवितासंग्रह प्रकाशनाचा समारंभ सुप्रसिद्ध गायिका, संगीत दिग्दर्शिका, कवयित्री श्रीमती मधुवंती पेठे यांच्या हस्ते रविवार दिनांक २८ एप्रिल या दिवशी स्वा. सावरकर सेवा केंद्र येथे पार पडला. व्यासपीठावर सुप्रसिद्ध अभिनेते श्री प्रसाद आठल्ये, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांची नात सुप्रसिद्ध निसर्गतज्ज्ञ प्रिया फुलंब्रीकर, सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शेखर आंबर्डेकर हे विशेष पाहुणे उपस्थित होते. उपस्थित मान्यवर तसेच अलका काटदरे यांच्या आप्त स्नेहीनी ‘प्रसव’ या कवितासंग्रहाच्या कवितांचे वाचन केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संवादिका अनुश्री क्षीरसागर यांनी अलका काटदरे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कवितांचे मर्म उलगडले. स्वा. सावरकर सेवा केंद्राचे कार्यवाह श्री. केशव परांजपे व श्रीमती मेधा आंबर्डेकर आणि स्नेहा अभ्यंकर यांचा या कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष पुढाकार होता. कार्यक्रमाची सांगता ग्रीन प्लॅटर तर्फे चटकदार आंबेडाळ आणि थंडगार पन्ह्याने झाली.