लेखिका श्रिया भागवत यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन

लेखिका श्रिया भागवत यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन

लेखिका श्रिया भागवत यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन

न्यूझीलंड सोसायटी ऑफ ऑथर्स या संस्थेच्यावतीने दरवर्षी अप्रकाशित कथा-कादंबऱ्यांसाठी प्रतिष्ठित ‘मायकेल गिफ्किन्स पुरस्कार’ जाहीर केला जातो. २०१८ पासून हा पुरस्कार दिला जात आहे. अवघ्या काहीदिवसांपूर्वी या पुरस्काराची नामांकन यादी जाहीर झाली. यंदा या पुरस्कारासाठी ४९ साहित्यिकांचे अर्ज आले होते. त्यातून १३ जणांची नामांकन यादी तयार करण्यात आली. या यादीत विलेपार्लेतील लेखिका श्रिया भागवत यांच्या ‘ऑन इन्टरगेशन ऑफ चॉईसेस’ या कथासंग्रहाचा समावेश आहे. या पुरस्काराच्या नामांकन यादीत स्थान मिळवणाऱ्या श्रिया या एकमेव भारतीय लेखिका असून गेली काही वर्ष न्यूझीलंड येथे त्या वास्तव्याला आहे. न्यूझीलंड येथील प्रसिद्ध लेखक, समीक्षक, प्रकाशक आणि संपादक मायकेल गिफ्किन्स यांच्या नावाने देण्यात येणारा हा पुरस्कार प्रामुख्याने अप्रकाशित कथा-कादंबऱ्यांसाठी दिला जातो.

Back to top