सुमेध वडावाला यांना स्नेहांजली पुरस्कार

सुमेध वडावाला यांना स्नेहांजली  पुरस्कार

सुमेध वडावाला यांना स्नेहांजली पुरस्कार

‘स्नेहल प्रकाशना’ तर्फे दिला जाणारा स्नेहांजली पुरस्कार डॉ.गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते सुमेध वडावाला यांना नुकताच प्रदान करण्यात आला. “नाना संकटांचा सामना करून स्वतःचं वा समाजाचं यशस्वी आयुष्य घडवणाऱ्या अनेक नायकनायिकांच्या आत्मकथा हातून लिहिल्या गेल्यामुळेच ‘स्नेहांजली पुरस्कार’ दिला गेला असावा, म्हणून हा पुरस्कार त्या सर्व आत्मकथानायक नायिकांनाच समर्पित करतो आहे.” असे भावपूर्ण उद्गार साहित्यिक सुमेध वडावाला (रिसबूड) यांनी काढले. कथा-कांदबरीलेखनात लौकिक मिळालेला असूनही वडावाला आवर्जून आत्मकथालेखनाकडे वळले. नामवंत प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या सर्व १४ आत्मकथांना विपुल आवृत्यांचा योग प्राप्त झाला. “या लेखनामुळे, एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं जगण्याची दुर्लभ संधी मिळाली, जगण्यातली कल्पनातीत जटीलता जगापुढे मांडता आली” असे त्यांनी नमूद केलं. स्वतःच्या लेखनाचा सदतीस वर्षांचा पट त्यांनी संक्षिप्तपणे उलगडून दाखवलेल्या या कार्यक्रमाला श्रोत्यांनी गर्दी केली होती.

Back to top