अंधेरी वाचन कट्टा – चित्रा वाघ यांचा महाकवी भासाची प्रतिभा आणि प्रतिमा’ या विषयावर बहारदार कार्यक्रम

रविवार दिनांक १० सप्टेंबर रोजी ‘अंधेरी वाचन कट्टा’ चा २२ वा कार्यक्रम चिल्ड्रन्स वेल्फेअर महाविद्यालय, वर्सोवा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात चित्रा वाघ यांनी ’महाकवी भासाची प्रतिभा आणि प्रतिमा’ या विषयावर एक बहारदार कार्यक्रम सादर केला. त्याचप्रमाणे अभिजात संस्कृत साहित्यातील आद्य नाटककार भास यांच्या प्रतिभेतून साकारलेल्या ’प्रतिमा’ या रामायणावर आधारित प्राचीन नाटकाचा रसाळ भाषेत आणि ओघवत्या शैलीत परिचय करून दिला. ’प्रतिमा’ या पाच अंकी संस्कृत नाटकातली पताकास्थाने, पात्रांचे परस्पर संबंध, शीर्षकाचे औचित्य, प्रतिमागृहात घडणारे नाट्य असे अनेक बारकावे ऐकताना श्रोते  रंगून गेले. तत्कालीन समाजाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याकडे बघण्याच्या प्रगल्भतेकडेही त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले. चित्रा वाघ यांचे निवेदन संपल्यावर त्यांनी श्रोत्यांच्या शंकांना समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या शेवटी अंधेरी वाचन कट्टाचे ज्येष्ठ सभासद प्रफुल्लचंद्र पुरंदरे यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाचा शेवट झाला.

Back to top