पार्ले येथे ग्रंथ दिन साजरा

पार्ले येथे ग्रंथ दिन साजरा

पार्ले येथे ग्रंथ दिन साजरा

दिनांक २४ एप्रिल, २०२३ रोजी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, पार्ले शाखा आणि पार्ले साहित्य कट्टा यांनी संयुक्तपणे ग्रंथ दिन साजरा केला.

या कार्यक्रमात प्रसिद्ध बालसाहित्यिक आणि कवी रमेश तांबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी शाखेच्या अध्यक्ष लता गुठे यांनी श्री तांबे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. साहित्यिक आणि अध्यक्ष माधवी कुंटे यांनी आपल्या प्रास्तविक भाषणात २३ एप्रिल रोजी जगभरात साजरा होणाऱ्या ग्रंथ दिनाचे महत्व विशद केले. त्यानंतर अशोक बेंडखळे, रमेश सावंत, चारुलता काळे, सुधीर सुखटणकर , सविता दामले, ज्ञानेश चांदेकर यांनी ग्रंथ आणि त्यांचे वाचन याबद्दल आपले अनुभव मांडले आणि त्या अनुषंगाने आपले विचार व्यक्त केले. प्रमुख अतिथि रमेश तांबे यांनी आपल्या भाषणात वाचनाचे महत्व विशद केले आणि त्यासंबंधात आपले रंजक अनुभव आणि बोधपर विचार मांडले. यावेळी त्यांनी आपल्या काही कविता सादर केल्या. या प्रसंगी वरील वक्त्यासहित पार्ले कट्ट्याची अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. याशिवाय इतर उपस्थित मान्यवर मंडळीत सदानंद डबीर, ज्ञानेश चांदेकर , पूजा राईलकर , प्रदीप पाटील, अल्पना कशाळकर, निशा वर्तक, ग्रंथालयाच्या मनिषा व नम्रता आणि काही सभासद यांचा समावेश होता. समारोपाच्या भाषणात सदानंद डबीर यांनी कार्यक्रमातील भाषणांचा आढावा घेतला आणि पुस्तके आणि भाषा याबद्दलची सद्यस्थिती स्वीकारून पुढे जायला हवे असे सांगितले.

Back to top