राहुल पुराणिक यांना भारत गौरव पुरस्कार २०२३ जाहीर!

राहुल पुराणिक यांना भारत गौरव पुरस्कार २०२३ जाहीर!

राहुल पुराणिक यांना भारत गौरव पुरस्कार २०२३ जाहीर!

विलेपार्ले येथील मध्यमवर्गीय, सुशिक्षित संयुक्त कुटुंबात वाढलेले श्री. राहुल पुराणिक हे साॅनी ग्रूप ऑफ कंपनीज चे चेअरमन आहेत. सॉनी ही जागतिक बहुराष्ट्रीय कंपनी आहे जी हॉस्पिटॅलिटी, डिस्टिलरी, बेव्हरेज रिटेल, रिअल इस्टेट गुंतवणूक, संयुक्त राष्ट्रांसाठी धोरणात्मक खरेदी, एव्हिएशन कार्गो आणि आरोग्यसेवा पुरवठा वितरण अशा सात प्रमुख उद्योगांमध्ये माहिर आहे. सॉनी ग्रुप ऑफ कंपनी फ्रान्स, आयर्लंड आणि सिंगापूर येथील कार्यालयांसह अटलांटा येथे स्थित आहे. राहुलने कोरोना काळात जॉर्जिया राज्यातील आपत्कालीन सेवांना पाठिंबा देण्यासाठी ‘सॉनी हेल्थकेअर’ ही आरोग्य सेवा कंपनी तयार केली. सॉनी हेल्थकेअरने परदेशातून हँड सॅनिटायझर, मेडिकल किट, मास्क आणि इतर वैयक्तिक संरक्षण उपकरणे कार्यक्षमतेने आयात केली आणि संपूर्ण जॉर्जियातील रुग्णालयांमध्ये वितरित केली त्याचप्रमाणे गेल्या आठ वर्षापासून राहुल आणि त्यांच्या पत्नी सौ. स्वप्ना पुराणिक समाजातील हायस्कूल आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. आतापर्यंत त्यांनी १५० हून अधिक विद्यार्थ्यांसोबत काम केले आहे. राहुल विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांचे अनुसरण करण्याचा सल्ला देतात आणि इतर काय करतात ते करण्याऐवजी त्यांच्याप्रमाणेच त्यांचे ध्येय लक्षात ठेवा असे मार्गदर्शन करतात. श्री. राहुल पुराणिक यांनी केलेल्या त्यांच्या आतापर्यंतच्या कार्य आणि कर्तुत्वासाठी त्यांना ‘भारत गौरव पुरस्कार २०२३’ जाहीर करण्यात आला आहे.

Back to top