‘अनुस्वर’ च्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा
रविवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी देशस्थ ऋग्वेदी संघ येथे अनुस्वर संस्थेचा ‘ओ साथी रे…. ‘ हा कार्यक्रम मोठ्या थाटात आणि उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुश्री क्षीरसागर यांनी केले. मेधा, शर्मिला, डॉ. वैशाली, स्वराली, अनुश्री, सचिन, डॉ. मंदार, विनायक , दिनेश , अजय, आदित्य या साऱ्या कलाकारांनी आपली गाणी उत्तम प्रकारे सादर केली.
श्री मिलिंद प्रभावळकर यांनी बॅनर, जाहिरात तसेच तांत्रिक गोष्टी सोबतच व्हिडिओ शूटिंगची संपूर्ण जबाबदारी सांभाळली.
कार्यक्रमाला मुंबई महानगरपालिकेच्या के ईस्ट विभागाचे माजी नगरसेवक श्री अभिजीत सामंत, महाराष्ट्र टाइम्स चे माजी संपादक श्री अशोक पानवलकर, श्री मुकुंद काका सराफ, डॉ. नीता व डॉ. राजीव कानिटकर असे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.