‘द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी’ पुरस्काराने पार्ल्यातील कलावंत सन्मानित

‘द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी’ पुरस्काराने पार्ल्यातील कलावंत सन्मानित

‘द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी’ पुरस्काराने पार्ल्यातील कलावंत सन्मानित

‘ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वाटचालीचा आनंद सोहळा २५ फेब्रुवारी रोजी आय.टी.सी. ग्रँड मराठा येथे अतिशय दिमाखात साजरा झाला. या संस्थेचे संस्थापक प्रवर्तक आणि सचिव डाॅ. संजय भिडे यांच्या ‘Business Through Friendship’ या ध्येयातून स्थापन झालेल्या संस्थेत देश विदेशातील मान्यवरांचा सहभाग आहे. गेली २० वर्षे या संस्थेतर्फे आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजाभिमुख नामवंतांना ‘द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी’ या पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा या पुरस्कारासाठी समाजातील विविध क्षेत्रातील २५ मान्यवरांची निवड करण्यात आली त्यात सुप्रसिध्द गायिका,संयोजिका,निर्मात्या नीला रवीन्द्र भिडे आणि चित्रकार, लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले विजयराज बोधनकर यांचा समावेश आहे.
नीला रवींद्र भिडे यांना त्यांच्या सांस्कृतिक, सांगितिक व सामाजिक क्षेत्रातील प्रदीर्घ यशस्वी वाटचालीसाठी TACCI या संस्थेने श्री जुनैद यावुझकान (कॉन्सुल जनरल ऑफ तुर्कीय) यांच्या हस्ते सन्मानित केले तर विजयराज बोधनकर यांना त्यांच्या अर्क चित्रांसाठी न्युझीलंडचे कौन्सिल जनरल आणि ट्रेड कमिशनर ग्रॅहॅम राओस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 

 

Back to top