प्रतिकूल परिस्थितीतही आर्यनने मिळवले ९६.४% गुण !

प्रतिकूल परिस्थितीतही आर्यनने मिळवले ९६.४% गुण !

प्रतिकूल परिस्थितीतही आर्यनने मिळवले ९६.४% गुण !

विलेपार्ले येथे राहणारा १६ वर्षाचा आर्यन रहाटे आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून अनेकांसाठी एक तेजाचा किरण ठरला आहे. १ नोव्हेंबर २०२२ पासून आर्यन Acute lymphoblastic leukaemia या कर्करोगाचा सामना करत आहे. १० वी ची आयसीएसई बोर्डाची परीक्षा सुरू असताना आर्यन सांताक्रूझ येथील सूर्या रूग्णालयात त्याच्या आयुष्यातील कठीण अशी परीक्षा देत होता परंतु, या परिस्थितीवर मात करत आर्यनने १० वी च्या आयसीएसई बोर्डाचे तीन पेपर शाळेतून तर तीन पेपर सूर्या रूग्णालयातील बेडवरून दिले. १४ मे २०२३ रोजी आर्यनचा १० वी चा निकाल लागला. त्यामध्ये त्याने आलेल्या संकटावर मात करत ९६.४% गुण मिळवून यश संपादन केले. आर्यनच्या या चिकाटीला सर्व पार्लेकरांकडून सलाम !
Back to top