‘CHAMPION’S ZONE’ – विशेष मुलांच्या खेळाडू वृत्तीला भरारी

‘CHAMPION’S ZONE’ – विशेष मुलांच्या खेळाडू वृत्तीला भरारी

‘CHAMPION’S ZONE’ – विशेष मुलांच्या खेळाडू वृत्तीला भरारी

२९ नोव्हेंबर २०२३ या दिवशी साठ्ये कॉलेजच्या टर्फ मैदानावर रसायनशास्त्र विषयाचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी, श्री. अभिषेक झा याने “चॅम्पियनस् झोन” (Champion’s Zone) या त्याच्या टर्फ मॅनेजमेंट विषयक उद्योग संकल्पनेला ओळख मिळावी या हेतूने विशेष सक्षम विद्यार्थ्यांसाठी “खेळ ऊर्जा” हे अनोखे संमेलन आयोजित केले होते. अभिषेकचे चॅम्पियनस् झोन हे Start-Up शाळा आणि महाविद्यालयांमधील टर्फ मैदानाचे व्यवस्थापन पाहते, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करते आणि खेळातील वंचित किंवा कमी प्राधान्य मिळणारा वर्ग म्हणजे मुली, महिला आणि विशेष अपंग मुले यांना चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचे चॅम्पियनस् झोन उद्दिष्ट आहे.
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या Institute of Management या मॅनेजमेंट कॉलेजने Centre for Entrepreneurship and Innovation (COEI) मध्ये आपल्या संकल्पनेसाठी मार्गदर्शन घेत असलेल्या अभिषेकने विशेष सक्षम विद्यार्थ्यांसाठी असलेल्या १४ शाळांमधून ५०० विद्यार्थ्यांना या “खेळ ऊर्जा” साठी एकत्र आणले. संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल गानू सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार श्री.‌ पराग अळवणी तर विशेष अतिथी म्हणून श्रीमती प्रिमला हिंगोराणी या ७९ वर्षी सुद्धा मॅरेथॉन धावणाऱ्या धावपटू उपस्थित होत्या.
अंध खेळाडूंच्या नेत्रदीपक क्रिकेटने “खेळ ऊर्जा”चे सामने सुरू झाले. दिव्यदृष्टी असलेले खेळाडू आवाजाचा मागोवा घेत फलंदाजी करताना तसेच अचूकपणे “रन आऊट” करताना बघणे हे केवळ अवर्णनीय होते.
कर्णबधीर आणि मानसिक विकलांग विद्यार्थ्यांचे विविध खेळांचे व वेगवेगळ्या वयोगटांसाठीचे ५० च्या वर सामने सुसंवादात पार पडले. टर्फवर खेळताना आनंदून गेलेले निरागस आनंदी चेहरे हे आयोजकांना समाधान देत होते व सर्वांमध्ये अधिकाधिक उत्साह आणि ऊर्जा निर्माण करत होते. असा अभूतपूर्व सोहळा पार पडला तो अभिषेकच्या अथक परिश्रमामुळे, COEI मधून मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे तसेच त्याचे ६० विद्यार्थी स्वयंसेवक, COEI च्या प्रमुख सुकृता पेठे यांचे मार्गदर्शन आणि साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे तसेच Institute of Management च्या प्रभारी संचालक डॉ. तेजश्री देशमुख यांचा पाठिंबा तसेच दोन्ही महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मनापासून झालेल्या सहभागामुळे! या कार्यक्रमाला अनेक उदार संस्था व व्यक्तींनी आर्थिक पाठबळ दिले यामुळे असा कार्यक्रम शक्य झाला.

सुकृता पेठे
सहाय्यक प्राध्यापिका, भौतिकशास्त्र विभाग, साठ्ये महाविद्यालय
In-Charge, PTVAIM’s COEI

 

Back to top