पुलोत्सव २०२३

पुलोत्सव २०२३

पुलोत्सव २०२३

लोकमान्य सेवा संघाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते खुद्द पु .ल.देशपांडे यांनी अनेकदा व्यक्त केलेले आहे. त्या ऋणानुबंधांना स्मरून दरवर्षी लोकमान्य सेवा संघातर्फे पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुलोत्सवाचे आयोजन केले जाते.बटाट्याची चाळ, असा मी असामी सारखे अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम सादर करणाऱ्या पुलंसारख्या अष्टपैलू प्रतिभावंताच्या स्मरणार्थ यंदा प्रथमच ’पुलोत्सवा’च्या निमित्ताने माधव दामोदर कोल्हटकर सांस्कृतिक शाखेतर्फे एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.बुधवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२३ रोजी पु.ल.देशपांडे सभागृहात स्पर्धा संपन्न झाली. एकूण 32 स्पर्धकांनी सादरीकरण केले. त्यापैकी अनेक स्पर्धकांनी स्वरचित संहितांचाही वापर केला हे विशेष. ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक माननीय राजदत्त, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका व अभिनेत्री मीरा वेलणकर आणि अनुभवी नाट्यकर्मी असलेले संस्थेचे कार्यवाह श्री.महेश काळे यांनी काम पाहिले. गट पहिला (१६ ते ३० वर्षे) (एकूण स्पर्धक- १५) यामध्ये मानसी जाधव, सिद्धेश शिंदे, जितू कदम, अनुश्री कानडे यांना प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ अशा अनुक्रमांकाने पारितोषिक मिळाले. गट दुसरा (३१ ते 60 वर्षे) (एकूण स्पर्धक – १२) यामध्ये कामाशी कुलकर्णी, श्रद्धा कैगास जोशी, ग्रीष्मा बेहरे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय , तृतीय अशी पारितोषिक मिळाली तर गट तिसरा ( ६१ वर्षांवरील) (एकूण स्पर्धक- ५) प्रकाश भाटवडेकर यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं. माननीय राजदत्त यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानपत्र आणि इतर स्पर्धकांना सहभाग पत्र देण्यात आली. स्पर्धेचे सूत्रसंचालन श्रीमती चित्रा वाघ यांनी केले तर कार्याध्यक्ष श्री. उदय तारदाळकर यांनी आभार-प्रदर्शन केले.

 

Back to top