डी. एन. शिरूर बालकाश्रम ची आनोखी दिवाळी

डी. एन. शिरूर बालकाश्रम ची आनोखी दिवाळी

डी. एन. शिरूर बालकाश्रम ची आनोखी दिवाळी

प्रार्थना समाज संचालित डी. एन. शिरूर बालकाश्रम येथे गेली१५ वर्षे प्रत्येक सणाला वेगवेगळ्या स्पर्धोचे आयोजन केले जाते. यावर्षी दिवळी निमित्त किल्ले, आकाश कंदील, भेटकार्ड बनवणे, रांगोळी स्पर्धा अशा अनेक स्पर्धोंचे आयोजन केले होते.
या आश्रमामध्ये एकूण ५५ मुलं राहत आहेत आणि मान्यता ६५ मुलांची आहे. ज्यांची ४ गटात मध्ये म्हणजेच गट एक :-राजा राम मोहन रॉय, गट दोन :- रामकृष्ण गोपाळ भांडारकर, गट तीन:- महादेव गोविंद रानडे, गट चार:- देवेंद्रनाथ ठाकूर अशी विभागणी केली आहे. यावर्षी दिवळी निमित्त चांद्रयानाच्या देखाव्याचा आकाशकंदील मुलांनी बनवला होता. सणानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेत मुलं अतिशय उत्साहाने भाग घेतात तसेच मुलांचा उत्साह टिकून राहावा यासाठी स्पर्धेत भाग घेतलेल्या मुलांच्या गटाला मार्क दिले जातात. या स्पर्धेमधून मुलांच्या कलागुणांना वाव आणि प्रोत्साहन मिळते.

Back to top